पॅपाराजीने मर्यादा ओलांडत गुपचूप काढलेल्या फोट...

पॅपाराजीने मर्यादा ओलांडत गुपचूप काढलेल्या फोटोमुळे आलिया संतापली, केली मुंबई पोलिसांकडे तक्रार (Alia Bhatt Angry On News Portal Who Clicked Photo From Her Living Room And Invading Her Privacy)

आलियाच्या नकळत तिची कोणतीही परवानगी न घेता पॅपाराजीने तिचा घरातील फोटो काढला. पॅपराजीने गुपचूप काढलेल्या या फोटोमुळे आलिया चांगलीच संतापली आहे.

सदर घटनेमुळे पुन्हा एकदा कलाकारांच्या खासगी जीवनाबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचे असते. त्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यामुळे वेळोवेळी त्यांचे फोटो काढण्यासाठी पॅपराजी त्यांच्या मागेमागे असतात. बऱ्याच वेळा पॅपराजी आणि सेलिब्रिटी यांच्यामध्ये अनबन होत असते. यावेळी आलिया भट्टने पॅपाराजीवर संताप व्यक्त करत मुंबई पोलिसांकडे त्याबद्दलची तक्रार नोंदवली आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती लिविंग रुममध्ये बसलेली दिसत आहे. तिचा हा घरातील फोटो काढताना पॅपराजीने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. पॅपराजीने गुपचूप काढलेल्या या फोटोमुळे आलिया चांगलीच संतापली आहे.

आलियाने इन्स्टास्टोरीला हा फोटो शेअर करत, ‘ही काय मस्करी आहे? मी दुपारी माझ्या लिविंग एरिअयामध्ये आराम करत बसली होती. तेव्हा मला असे वाटले की मला कोणी तरी पाहात आहे. जेव्हा मी वर पाहिले तेव्हा दोन व्यक्ती शेजारच्या बिल्डींगवरुन माझे फोटो काढत होते. हे सर्व काय चाललंय आणि एखाद्याचे असे फोटो घेणे योग्य आहे का? हे एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्यासारखे आहे. एक मर्यादा असते, जी पार केली जाऊ शकत नाही. मात्र तुम्ही सर्व मर्यादा तोडल्या आहेत’ या अशयाची कॅप्शन तिने दिली आहे. या पोस्टवर आलियाने मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.

तर अर्जुन कपूर आणि आलियाची बहीण शाहीन भट्ट यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया देत या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. अर्जुन कपूरच्या मते, जर एखाद्या महिलेला तिच्या घरात सुरक्षित वाटत नसेल तर याचा अर्थ असा होतो की सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत.

एम्बेड

तसेच अभिनेत्री अनुष्का शर्माने आलियाला पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे. अनुष्काने आलियाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत, ‘असे हे लोक पहिल्यांदा करत नाहीत. जवळपास दोन वर्षांपूर्वी आम्ही यांना असेच आमचे फोटो काढताना पाहिले होते आणि आम्ही त्यांना चांगलेच सुनावले होते. हे सगळं करुन तुम्हाला इज्जत मिळेल असे वाटते का? अतिशय लज्जास्पद वागणूक आहे, असं तिने म्हटले आहे.