‘मिस्ट्री गर्ल’सोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो...

‘मिस्ट्री गर्ल’सोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरल; कोण आहे नाओमिका सरन? (Akshay Kumar’s Son Aarav Bhatia Features In Unseen Pics With Naomika Saran. Do You Know Who She Is?)

बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच त्यांची मुलं सोशल मीडियावर बरीच चर्चेत असतात. स्टारकिड्सचे लूक, त्यांच्या मित्रमैत्रिणी, खासगी आयुष्य याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे मिस्ट्री गर्लसोबत व्हायरल झालेले आरवचे फोटो. या फोटोंमध्ये आरवसोबत दिसत असलेली ही तरुणी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, ही मिस्ट्री गर्ल आरवची मैत्रीण नसून, बहीण आहे.

सध्या आरव कुमार आणि नाओमिकाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी आरव कुमार या मुलीला डेट करत असल्याचे म्हटले होते. या सेल्फी फोटोमध्ये आरवने निळ्या रंगाचा शर्ट आणि गळ्यात नेकलेस घातला आहे. तर नाओमिकाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल टॉप आणि त्यावर गळ्यात नेकलेस घातला आहे.

मात्र, ही मुलगी आरवची मैत्रीण नसून, त्याची लहान बहीण नाओमिका आहे. नाओमिका ही ट्विंकल खन्नाची धाकटी बहीण रिंकी खन्ना हिची मुलगी आहे. आरव आणि नाओमिकाचे अनेक फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ट्विंकल खन्ना देखील या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत असते.

आरव कुमारच्या बहीणीचे नाव नाओमिका सरन असून, ती त्याच्या मावशीची मुलगी आहे. आरव कुमार हा आता २० वर्षांचा झाला असून, नाओमिका सरन ही १८ वर्षांची आहे. दोघेही नेहमीच एकत्र दिसतात. दोघांमध्ये भाऊ-बहीणीसोबतच छान मैत्रीचं नातं देखील आहे. दोघांचे सेल्फी पाहून अनेकदा त्यांच्या चाहत्यांचा गैरसमज होतो. मात्र, आता ती आरवची बहीण असल्याचे कळताच सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अक्षय कुमारचा मुलगा आरव हा स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवतो. त्याचे इन्स्टाग्रामवर अकाऊंटदेखील नाही.

मात्र, नाओमिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, दररोज ती तिचे नवनवे फोटो शेअर करत असते. आरव आणि नाओमिकाचे फोटो पाहून चाहते त्यांना मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याचा सल्ला देत आहेत.