अक्षय कुमारच्या ‘गोरखा’ या नव्या चि...

अक्षय कुमारच्या ‘गोरखा’ या नव्या चित्रपटात बहाद्दूर अपंग मेजरची कथा (Akshay Kumar’s New Film ‘Gorkha’ Depicts The Heroism Of An Handicapped Major)

Akshay Kumar's New Film, Gorkha, An Handicapped Major

दसऱ्याच्या शुभ मुर्हूतावर अक्षय कुमारने ‘गोरखा’ या आपल्या नव्या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रसिद्ध केले. हा चित्रपट स्वतः अक्षयने प्रस्तुत केला आहे.

Akshay Kumar's New Film, Gorkha, An Handicapped Major

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या चित्रपटात अक्षय, मेजर जनरल इयान कार्डोजो या लष्करी अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. त्या संदर्भात अक्षय म्हणतो, “महान युद्ध नायक मेजर जनरल कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ही भूमिका करून हा चित्रपट प्रस्तुत करण्याचा मला मोठा अभिमान आहे.”

Akshay Kumar's New Film, Gorkha, An Handicapped Major

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अक्षयचा आवेश दिसत असून त्याच्या हातात गुरखा रेजिमेंटची ओळख असलेले कुकरी हे हत्यार आहे.

Akshay Kumar's New Film, Gorkha, An Handicapped Major

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरन सिंह करीत असून नीरज यादव आणि संजय या दोघांनी त्याची पटकथा लिहिली आहे. आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘अतरंगी रे’ आणि  ‘रक्षाबंधन’ या चित्रपटानंतर या निर्मात्यांचा अक्षयला घेऊन हा तिसरा चित्रपट आहे.

Akshay Kumar's New Film, Gorkha, An Handicapped Major

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अपंग असूनसुद्धा मेजर जनरल इयान कार्डोजो या बहाद्दूर लष्करी अधिकाऱ्याने एक ब्रिगेड व बटालियनचे नेतृत्व केले होते. त्यांचं नाव उच्चारायला अवघड वाटत असल्याने गुरखा रेजिमेंटमध्ये काडतूस साहेब या नावाने ते संबोधले जायचे.

Akshay Kumar's New Film, Gorkha, An Handicapped Major

त्यांना अति विशिष्ट सेवा पदक देण्यात आले होते. त्यांना युद्धभूमीवर लढत असतानाच अपंगत्व आले होते. तरी ते न डगमगता आपले शौर्य दाखवत राहिले.