अक्षय कुमारच्या आईचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्ष...
अक्षय कुमारच्या आईचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास (Akshay Kumar’s Mother Passes Away)

By Anita Bagwe in मनोरंजन
अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळातील समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. चाहते आणि शुभचिंतकांनी आईसाठी जी प्रार्थना केली त्यासाठी अक्षयने सगळ्यांचे आभार मानले आहेत.

अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला येतो. मुलाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षयने ट्विटमध्ये लिहिले – माझी आई माझा कणा होती. मला आज आतून खूप दुःख झाले आहे, जे मी सहन करू शकत नाही. माझी आई अरुणा भाटिया यांचे आज सकाळी निधन झाले. आता ती माझ्या वडिलांना दुसऱ्या जगात भेटेल. ओम शांती.
