सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अक्षय कुमार ज्वेलरी वि...

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अक्षय कुमार ज्वेलरी विकत होता : आपल्या संघर्ष काळातील गुपित स्वतःच उघड केले (Akshay Kumar Used To Sell Jewelry Before Coming To Films, Tells His Struggle Story)

अक्षय कुमार आज सुपरस्टार बनला आहे. तो उत्तम स्वयंपाकी आहे. अन्‌ तायकांडो युद्धकलेचा ब्लॅक बेल्ट खेळाडू आहे. पण चित्रसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी, गुजराण करण्यासाठी तो चक्क ज्वेलरी विकण्याचं काम करत होता. त्याच्या संघर्ष काळातील हे गुपित त्याने स्वतःच उघड केलं आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अलिकडेच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात पाहुणा कलाकार म्हणून सामील झालेल्या अक्षयने आपली ही संघर्षमय जीवनगाथा मांडली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी आपण दिल्लीमध्ये कुंदन ज्वेलरी विकत होतो, असं त्यानं अमिताभ बच्चनला सांगितलं. तो बोलला, “दिल्लीतून मी ७ ते १० हजार रुपयांना कुंदन ज्वेलरी विकत घ्यायचो. अन्‌ ती मुंबईला आणून विकत असे. त्यातून मला ११-१२ हजार रुपये फायदा व्हायचा. हा धंदा मी ३-४ वर्षे केला.”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अमिताभने विचारणा केल्यावरून अक्षयने हेही सांगितलं की, “मी जिलेबी, छोले भटुरे, समोसे बनवून विकायचो. रेस्टॉरंटमध्ये टेबल नीटनेटकं लागलेला आहे की नाही, त्याकडे माझा कटाक्ष असायचा. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एक अशी भिंत असते, जिच्यावर शेफ आपली आवडती छायाचित्रे लावतात. त्यावर मी अमिताभ बच्चन, जॅकी चॅन, श्रीदेवी आणि सिल्वेस्टर स्टॅलॉन यांची चित्रे लावली होती. अन्‌ माझं नशीब किती बलवत्तर बघा, मी या सर्व कलाकारांसोबत काम केलं.”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अक्षयने पुढे असंही सांगितलं की, “माझ्या जीवनातील हा चमत्कार आहे. जॅकी चॅन सोबत मी काम केलं नाही. पण त्यांना भेटलो आहे. अन्‌ ॲवॉर्ड प्रदान केलं आहे.”

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या प्रमोशनसाठी तो ‘करोडपती’ कार्यक्रमात दाखल झाला होता.