शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार : महेश ...

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार : महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त (Akshay Kumar To Play The Role Of Shivaji Maharaj In Mahesh Manjrekar’s New Marathi Historical Film)

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शन करत असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त झाला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

आतापावेतो छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तृत्वगाथा सांगणारे चित्रपट आले आहेत. त्यामध्ये अमोल कोल्हे, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, गश्मीर महाजनी, सुबोध भावे इत्यादी कलाकारांनी महाराजांच्या भूमिका केल्या आहेत. एका सामाजिक चित्रपटात महेश मांजरेकरने शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. आता या नव्या ऐतिहासिक चित्रपटात अक्षय कुमार शिवाजी महाराज साकार करणार असल्याने चित्रपटाचे ग्लॅमर वाढले आहे.