ॲक्शन हिरो अक्षय कुमारला करोनाची लागण (Akshay K...

ॲक्शन हिरो अक्षय कुमारला करोनाची लागण (Akshay Kumar test Corona Positive)


करोना विषाणूच्या संसर्गाची ही दुसरी लाट अधिकच झपाट्याने वाढत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता बॉलिवूडचा ॲक्शन हिरो अक्षय कुमारला करोनाची लागण झाली असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे. सध्या अक्षय होम क्वारंटाइन आहे.

अक्षयने ट्विट करत आपली करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “आज सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. माझी तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरक्षेसंबधीच्या सर्व नियमांचे मी पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या, अशी विनंती त्याने आपल्या ट्वीटमध्ये केली आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम