अभिनेत्री असिनचे लग्न लावण्यात अक्षय कुमारने नि...

अभिनेत्री असिनचे लग्न लावण्यात अक्षय कुमारने निभावली महत्वाची भूमिका (Akshay Kumar Played a Big Role in Getting Asin Married, Actor Introduced Both of Them)

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री असिन हिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘गजनी’ चित्रपटातील शानदार अभिनयाने तिच्या चाहत्यांची संख्या कमालीची वाढली. पण लग्नानंतर असिन मोठ्या पडद्यावरून गायब झाली आहे, त्यामुळे ती आता कुठे आहे आणि काय करतेय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते अजूनही उत्सुक आहेत. फार कमी लोकांना माहिती आहे की अक्षय कुमारने असिनचे लग्न ठरविण्यात मोठी भूमिका बजावली होती. अक्षयमुळेच असिनची तिच्या जीवनसाथीसोबत भेट झाली होती.

असिन हिने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. साऊथमध्ये सुद्धा असिन खूप लोकप्रिय आहे. असिनचे खरे आयुष्य एखाद्या चित्रपटातील प्रेमकहाणीप्रमाणेच आहे.

 जेव्हा असिन  राहुल शर्माला भेटली तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की ती नंतर त्याच्याशी लग्न करेल. असिन आणि राहुलची ओळख करून देण्यात अक्षय कुमारची सर्वात मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते.  अक्षय कुमार आणि असिन ‘हाऊलफुल 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खासगी जेटने बांग्लादेशला जात होते. त्याचवेळी अक्षयने फ्लाइटमध्ये असिनची राहुलशी ओळख करून दिली होती.

असिनला पाहताच क्षणी राहुल तिच्या प्रेमात पडला. पुढे अक्षयनेच असिनकडे राहुल तर्फे लग्नाची मागणी घातली होती. पण असिन हिने तेव्हा ती मागणी नाकारली. पण नंतर असिनला राहुलमधला साधेपणा भावला. प्रायवेट जेटची सोय करण्यापासून ते अगदी संपूर्ण चित्रपटाच्या प्रमोशनचा इव्हेंट हाताळण्याचे काम राहुलने अगदी चोख पार पाडले होते. त्याची हीच गोष्ट असिनला खूप आवडली.

करोडपती असूनही राहुल ज्या साधेपणात वावरतो ही गोष्ट असिनला खूप आवडली. राहुलसोबत लग्न झाल्यावर असिन चित्रपटसृष्टीपासून दुरावली. तिने आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आता या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.