या विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला हो...

या विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता अक्षय कुमार (Akshay Kumar Has an Old Relationship With Controversies, Actor Came Into Headlines Due to These Reasons)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट सलग फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे अक्षय त्याच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. बेल-बॉटम, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज नंतर अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षयचा सम्राट अशोक हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडला होता. पण अक्षयची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तो अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे.

२००९ मध्ये झालेल्या एका फॅशन शो वेळी अक्षयने सर्वांसमोर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आपल्या पत्नी बोलावून आपल्या पॅण्टची चेन उघडायला सांगितली होती. या प्रकारामध्ये खूप गोंधळ निर्माण झालेला. त्यावेळी अनेकांनी ट्विंकल आणि अक्षयवर पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची मागणी केलेली.

इंडस्ट्रीत अक्षय कुमारचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.अक्षय कुमारचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होते. त्याच्यावर अनेक अभिनेत्रींनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये पूजा बत्रा, आयेशा जुल्का, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरुन अनेकदा ट्रोल केले जाते. त्याच्याकडे अजूनही भारताचे नागरिकत्व नाही. त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. पण अक्षयच्या म्हणण्यानुसार तो भारतात काम करतो आणि त्याबदली भारत सरकारला करही देतो.

२०१६ मध्ये आलेला अक्षयचा ‘रुस्तम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, मात्र या चित्रपटामुळे अक्षयला वादांनाही सामोरे जावे लागले होते. या चित्रपटात अक्षयने नौदलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, पण नंतर त्याने चित्रपटात परिधान केलेल्या पोशाखाचा लिलाव करण्याबाबत वक्तव्य केले होते, ज्यामुळे बराच गोंधळ झाला होता.