ट्विंकल खन्नाला घाबरुन अक्षय कुमारने मध्येच सोड...

ट्विंकल खन्नाला घाबरुन अक्षय कुमारने मध्येच सोडला होता चित्रपट, पत्नीने प्रियंका चोप्रावरुन दिली होती धमकी (Akshay Kumar Had Left This Film Due to Fear of Twinkle Khanna, She Gave Him Warning About Priyanka Chopra)

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. अक्षयच्या बहुतेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे पण आता मात्र अक्षयचे चित्रपट फारशी कमाई करत नाहीत. अक्षयने प्रियांका चोप्रासह इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे. अक्षय आणि प्रियांका चोप्राने ‘अंदाज’, ‘ऐतराज’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘वक्त: रेस अगेन्स्ट टाइम’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अक्षय कुमारने पत्नी ट्विंकलला घाबरुन एक चित्रपट अर्धवट सोडला होता.

पत्नी ट्विंकलने ताकीद दिल्यामुळेच अक्षय कुमारने प्रियंका चोप्रासोबतच्या एका चित्रपटाचे शूटिंग मध्येच सोडल्याचे बोलले जात आहे. अक्षय प्रियंकासोबत बरसात या चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही घटना घडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दर्शन होते. त्यांनीच एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती.

 अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा जेव्हा ‘बरसात’ चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांच्या अफेअरची चर्चांना उधाण आले होते. या चित्रपटाच्या शीर्षक गीतासोबतच या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते, मात्र अचानक अक्षयने चित्रपट सोडून दिल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली. अक्षयने मध्येच चित्रपट का सोडला हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

ट्विंकलने अक्षयला प्रियंकासोबत काम करण्यास बंदी घातल्याचे बोलले जाते. अक्षय आणि प्रियकांच्या सतत होणाऱ्या अफेअर्सच्या चर्चांना कंटाळून ट्विंकलने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. पण अक्षयने मात्र आपण चित्रपट सोडण्यापाठी प्रियंकाचा संबंध नसल्याचे म्हटले होते.

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितले की, त्यावेळी अक्षय वैयक्तिक अडचणीत होता.तो त्याच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यात व्यस्त असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. अन्यथा तो चित्रपटातून असा अचानक बाहेर जाणारा नाही. अक्षयने चित्रपट सोडल्यानंतर आम्ही द्विधा मनस्थितीत होतो, पण बॉबी देओलने आम्हाला या कोंडीतून बाहेर काढल्याबद्दल देवाचे आभार मानतो.

या चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा कधीच एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. या चित्रपटात प्रियंका व्यतिरिक्त कतरिना कैफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत होती, मात्र अक्षयने चित्रपट सोडल्यानंतर कतरिनानेसुद्धा तारखांमुळे चित्रपट सोडला. यानंतर अक्षयने सोडलेला चित्रपट ‘बरसात’ प्रियांका चोप्रा, बॉबी देओल आणि बिपाशा बसूसोबत पूर्ण झाला.

अक्षय कुमारने सुनील दर्शनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांनी पहिल्यांदा 1999 मध्ये आलेल्या ‘जंवार’ चित्रपटात एकत्र काम केले होते, ज्यामध्ये अक्षयच्या विरुद्ध शिल्पा शेट्टी आणि करिश्मा कपूर दिसल्या होत्या. यानंतर अक्षय कुमारने सुनील दर्शनसोबत ‘एक रिश्ता’, ‘तलाश: द हंट बिगिन्स’, ‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर’ आणि ‘मेरे जीवन साथी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.