अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉप होत असण्यापाठी स्वत...

अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉप होत असण्यापाठी स्वतःला ठरवले जबाबदार(Akshay Kumar Breaks Silence On Back To Back Flop Movies, Says- It’s My Fault 100%, Even Cricketer Does Not Hit Century Every Day)

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 2.55 कोटींची कमाई केली होती, त्यामुळे अक्षयला खूप ट्रोल केले जात आहे.

आता अक्षयने यावर मौन सोडले असून बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट देण्याबाबत म्हटले आहे की, चित्रपट न चालणे म्हणजे माझी कुठेतरी चूक होत आहे.सतत फ्लॉप चित्रपट दिल्याबद्दल अक्षय कुमार एका मुलाखतीत म्हणाला, माझ्यासोबत हे पहिल्यांदा घडत नाहीये. प्रत्येक क्रिकेटर रोज शतक ठोकत नाही. जेव्हा मी इंडस्ट्रीत काम करायला सुरूवात केली तेव्हा माझे 16 चित्रपट सलग फ्लॉप झाले होते.

त्यानंतर पुढे माझे 8 चित्रपट फ्लॉप झाले. हे सर्व घडत राहते. कदाचित मला प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे ओळखता आलेले नाही.अक्षय कुमार पुढे म्हणाला, प्रेक्षकांना कदाचित मी बदललेला हवा आहे आणि मी बदलणार आहे. लोकांना तसे आवडले तर मी तसाच राहीन. मी इतर प्रकारच्या गोष्टी करू लागलो कारण मला वाटले की तेच चित्रपट बरेच लोक पाहतील.

पण आता चाहत्यांसाठी मी स्वतःला बदलणार आहे.अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. पण हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. गेल्या वर्षीही अक्षयचा एकही चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. गेल्या वर्षी त्याचे ‘बच्चन पांडे’ ‘सम्राट पृथ्वीराज’ ‘रखा बंधन’ आणि ‘राम सेतू’ हे चारही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. यंदाही त्याची सुरुवात खूपच खराब झालेली दिसते.