अक्षय केळकरने कोरले बिग बॉस सीजन चारच्या ट्रॉफी...

अक्षय केळकरने कोरले बिग बॉस सीजन चारच्या ट्रॉफीवर नाव(Akshay Kelkar wins the Bigg Boss season 4)

बिग बॉस मराठी सीजन ४ चा महाअंतिम सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात अपूर्वा नेमळेकर अक्षय केळकर किरण माने अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे पाच फायनलिस्ट होते.

सीझनच्या सुरुवातीपासूनच या खेळाबद्दल तसेच या खेळातील सदस्यांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढली होती. आता ही उत्सुकता संपली असून अभिनेता अक्षय केळकर हा या सिझनचा विजेता ठरला आहे.

या महाअंतिम सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात अभिनेत्री राखी सावंत सुरुवातीलाच नऊ लाख रुपये घेऊन बाहेर पडली.

त्यानंतर उरलेल्या टॉप ४ मधून अमृता धोंगडेला हा शो सोडावा लागला. आणि मग किरण माने अक्षय केळकर व पूर्व नेमळेकर हे टॉप तीन मध्ये पोहोचले. त्यांच्यातून साताऱ्याचे किरण माने बाहेर पडले.

त्यामुळे बिग बॉसच्या घराची लाईट बंद करून बाहेर येण्याचा मान अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर यांना मिळाला. या दोघांमधील विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली असतानाच शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी अक्षय केळकरचे नाव विजेता म्हणून घोषित केले.