अक्षय कुमार, करीना, अनुष्का शर्मा इत्यादी कलाका...

अक्षय कुमार, करीना, अनुष्का शर्मा इत्यादी कलाकारांनी चाहत्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा! (Akshay – Kareena – Anushka : These Bollywood Stars Wish Fans A Happy New Year)

आज २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. सगळे जण आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडच्या सितार्यांनी देखील आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार
सूर्यनमस्कार घालत असलेला व गायत्री मंत्राचे पठण करत असलेला आपला व्हिडीओ शेअर करून अक्षय कुमारने वेगळ्या पद्धतीने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्यात असाही मजकूर दिला आहे की, सर्वांना आरोग्य व आनंद लाभो या सदिच्छे सोबत हॅपी न्यू इयर!

आलिया भट्ट
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र सुट्टी घालवत आहेत. त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया म्हणते – सुरक्षित राहा …. हसत राहा ….. साधे राहा आणि खूप प्रेम द्या!

शिल्पा शेट्टी
एक जंपिंग बुमरँग शेअर करत शिल्पा शेट्टी म्हणते – सकारात्मकता आणि उत्साहाने  २०२२ मध्ये जंप. सर्वांना या नव्या वर्षात समृध्दी  आणि चांगले आरोग्य लाभो! गेल्या वर्षातील सगळे त्रास विसरून नव्या वर्षाची सुरुवात करा.

करीना कपूर
करीना कपूरने काल रात्री सर्व कुटुंबियांसह पार्टी साजरी केली. या पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून करीना लिहिते – २०२२ साली वास घेण्याची क्षमता कोणी  घालवणार नाही. लाल रंगाचा पायजमा व पाऊट घालून तिने फोटो पण शेअर केला आहे.

अनुष्का शर्मा
अनुष्का, विराट सोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. तिथून तिने न्यू ईयर पार्टीचा व्हिडीओ व फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगना राणावत
आपल्या नव्या वर्षाची सुरुवात कंगना, देव दर्शनाने करत आहे. भरजरी केशरी साडीत तिनं आपला फोटो शेअर करून म्हटलं आहे की, ‘नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! तिरुपती बालाजींच्या दर्शनाने मी नवीन वर्षाची सुरुवात करते आहे. हे वर्ष संस्मरणीय असेल, अशी आशा आहे.’

कृती सेनन
ब्राईट ऑरेंज रंगाचं स्वेटर घालून कृती सेनन थंडी अनुभवते आहे. ती म्हणते, ‘माझ्या स्वेटर इतकंच उज्वल तुमचं २०२२ हे वर्ष होवो.’