अजय पुरकरने विशाळगढ पायथ्याशी बांधले नवे घर (Aj...

अजय पुरकरने विशाळगढ पायथ्याशी बांधले नवे घर (Ajay Purkar The Actor Who played The Role of Bajiprabhu Deshpande Built His New House At Vishalgadh Fort)

19 जूनला प्रवाह पिक्चरवर पावनखिंड सिनेमाचा प्रिमियर दाखवण्यात येणार आहे. पावनखिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशंपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेते अजय पूरकर यांनी साकारली होती. प्रत्येक कलाकार त्याच्या हाती आलेली भूमिका हा जीवंत करण्याचा प्रयत्न करत असतो.

अजय पूरकर यांनी देखील पडद्यावर बाजीप्रभू जणू काही खरेच अवतरले आहेत अशी भूमिका साकारली होती. त्यांनी ही भूमिका खऱ्या अर्थाने जगली.
स्वत:च घर असावं अशी प्रत्येकाचं स्वप्न असतं. तशीच पूरकरांचीसुद्धा होती. ज्या मातीत शिवरायांनी इतिहास घडवला. शिवरायांच्या, बाजीप्रभूंच्या तसेच इतर मावळ्यांच्या अस्तित्वाची खूण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपलं स्वत:च घर असावं अशी अजय यांची इच्छा होती. त्याची ती इच्छा आता पूर्ण झाली आहे. बाजीप्रभू यांच्यावर असलेल्या श्रद्धा आणि प्रेमापोटी अजय पूरकर यांनी चक्क विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. अजयच्या नव्या घराचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यात त्याच्या घराचे बांधकाम सुरु असलेले दिसते. लाल मातीत बांधलेलं घर खूप छान दिसत आहे.

अजय पूरकर सध्या मुलगी झाली हो मालिकेत साजिरीच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. यापूर्वी ते कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत नकारात्मक पात्र साकारत होते. त्यांच्या कोड मंत्र नाटकाला एकाच वर्षात २४ पुरस्कार मिळाले. प्रेमाची गोष्ट, कदाचित, बालगंधर्व, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या चित्रपटांत त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.