काजोल-अजय देवगन यांची लेक न्यासाने रॅम्प वॉक कर...

काजोल-अजय देवगन यांची लेक न्यासाने रॅम्प वॉक करून सगळ्यांचं मन जिंकलं (Ajay-Kajol’s Daughter Nysa Devgn Poses For Manish Malhotra In A Thigh High-Slit Outfit)

ग्लॅमर आणि प्रकाशझोतापासून दूर राहणाऱ्या अजय देवगन आणि काजोलची लाडकी लेक न्यासाने मात्र तिच्या हॉट लुक्स आणि ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे.  

नुकतेच न्यासाने लॅक्मे फॅशन वीक २०२२ मध्ये मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केले. मनीषने  त्याच्या इन्स्टाग्राम वर न्यासाचा फोटो शेअर केला आहे ज्यात ती डिझायनर ड्रेसमध्ये दिसत आहे. हा ड्रेस मनीष मल्होत्रानेच डिझाइन केलेला आहे. थाई-हाई स्लिट लॉन्ग स्कर्ट आणि मल्टी कलर क्रॉप टॉपमध्ये न्यासा अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.  

मनीषने न्यासाच्या फोटोला कॅप्शन दिली आहे – न्यू-एज ऑर्डर डिफ्यूज ट्राइबमधील सुंदर न्यासा देवगन. चाहते या फोटोवर भरपूर कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की, न्यासाला तिच्या आईकडून सौंदर्य आणि वडिलांकडून नजरेतील आत्मविश्वास मिळाला आहे. चाहते न्यासाचे जोरदार कौतुक करत आहेत. पुढची क्वीन न्यासाच असेही ते म्हणत आहेत.

शनाया शोस्टॉपर होती, तिच्यासोबत सिद्धांत डिफ्यूज थीममध्ये रॅम्पवर दिसला.

त्याचवेळी जान्हवीही अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसली.

न्यासा व्यतिरिक्त, सिद्धांत चतुर्वेदी, शनाया कपूर आणि जान्हवी यांनी देखील मनीषसाठी रॅम्प वॉक केले परंतु सगळ्यांचं लक्ष न्यासाने वेधले.

न्यासाच्या चित्रपटांमधील प्रवेशाबाबत बोलताना काजोल म्हणाली की, ‘ती बॉलिवूडमध्ये येण्यासाठी फारशी उत्सुक नाही. आता न्यासा कोणते करिअर निवडते ते पाहू.’