अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी गरोदर, लग्नाच्या 6 ...

अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी गरोदर, लग्नाच्या 6 वर्षांनी इशिता दत्ता होणार आई(Ajay Devgn’s Onscreen Daughter Ishita Dutta is Pregnant After 6 Years of Marriage)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी इशिता दत्ता गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी इशिता दत्ता आपल्या गरोदरपणाची बातमी मिळाल्यापासून खूप आनंदी आहे. लग्नानंतरही सहा वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे. अभिनेत्री इशिता नुकतीच पापाराझींसमोर आपला बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली होती.

लग्नाच्या जवळपास 6 वर्षांनी आयुष्यात हा आनंदाचा क्षण आल्यामुळे इशिताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इशिता दत्ताचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री ब्राऊन ड्रेसमध्ये आपला बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. गरोदरपणाची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

आत्तापर्यंत इशिताने आपल्या प्रेग्नंसीबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलेले नाही किंवा ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअरही केलेली नाही, पण पापाराझी कॅमेऱ्यासमोर येताच इशिताचे गुपित उघड झाले. अभिनेत्री नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली, तेव्हा तिचा बेबी बंप कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होता आणि फोटो समोर आल्यानंतर सर्व चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

सुमारे दोन वर्षांपूर्वीही इशिता दत्ताच्या प्रेग्नंसीबद्दल अफवा पसरल्या होत्या, मात्र त्यानंतर अभिनेत्रीने मीडियासमोर येऊन या अफवा फेटाळून लावल्या. आपण प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट केले होते, पण आता लग्नाच्या जवळपास 6 वर्षानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात हा आनंद आला आहे.

इशिताने सुप्रसिद्ध अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 2017 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. दोघांच्या लग्नाला सहा वर्षे झाली असून आता लवकरच दोघेही आई-वडील होणार आहेत. वत्सल सेठची पत्नी इशिता दत्ता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे.

इशिता दत्ता ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या सुपरहिट चित्रपटात तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती, तर श्रिया सरन, तब्बू आणि अक्षय खन्ना या कलाकारांनीही या चित्रपटात काम केले होते. इशिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम