मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने, अजय देवगणने बनवल...

मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने, अजय देवगणने बनवला अती दक्षता विभाग (Ajay Devgan Joins Hands With BMC To Set Up A 20-Bed COVID-19 ICU)

करोनाग्रस्त रुग्णांवर योग्य ते इलाज व्हावे म्हणून बॉलिवूडच्या बऱ्याच कलावंतांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र त्यामध्ये अजय देवगणने मोठी बाजी मारली आहे. त्याने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने, शिवाजी पार्क परिसरात आणीबाणी कक्षाची स्थापना केली असून त्यासाठी एकूण १ कोटी रुपये गोळा केले आहेत.

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या भारत स्काऊटस्‌ ॲन्ड गाईडस्‌ या हॉलचे रुपांतर कोविड-१९ च्या उपचारासाठी करण्यात आले असून त्यामध्ये अती दक्षता विभागाचे २० बेडस्‌ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट आणि पॅरा मॉनिटर यांनी हा विभाग सुसज्ज करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक ती १ कोटी रुपयांची रक्कम अजय देवगण फाऊंडेशनच्या वतीने उभारण्यात आली. त्यामध्ये बोनी कपूर, आनंद पंडित (चित्रपट निर्माते), तरुण राठी (बिझनेसमन), आर. पी. यादव (ॲक्शन डायरेक्टर), लव रंजन, लीना यादव, आशिम बजाज, रजनीश खनुजा, समीर नायर, दीपक धर, ऋषी नेगी हे सामील आहेत.

अशा चांगल्या कामासाठी अजय देवगण नेहमीच पुढे आला आहे. गेल्या वर्षी देखील त्याने व्हेंटिलेटर्सची व्यवस्था केली होती.