अजय आणि काजोलने मुलगा युगच्या वाढदिवसानिमित्त स...

अजय आणि काजोलने मुलगा युगच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल नोट लिहित दिल्या खास शुभेच्छा (Ajay Devgn and Kajol pen heartfelt wishes for son Yug on his birthday, Share Unseen pics)

बॉलिवूडचे स्टार कपल अजय देवगण आणि काजोल आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याकडेही तितकेच लक्ष देतात. दोघांचेही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे,  अजय देवगण आणि काजोलला दोन मुले आहेत.

आजचा दिवस देवगण कुटुंबासाठी खूप खास आहे, कारण त्यांचा मुलगा युग आज १२ वर्षांचा झाला आहे. आज 13 सप्टेंबरला युगचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी काजोल आणि अजय देवगणने आपल्या मुलासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, दोघांनीही मुलासाठी एक खास नोट शेअर केली आहे आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी खूप आशीर्वाद दिले आहेत.

काजोलने सोशल मीडियावर युगसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘तुम्ही आनंदी क्षणांचे जास्तीत जास्त फोटो क्लिक करा, कारण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आवश्यक असतात. माझ्या मनापासून हसण्यामागे जे कारण आहे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्या चेहऱ्यावर हेच हास्य कायम ठेव.” हा फोटो त्यांच्या सहलीतला असावा असा अंदाज बांधला जात आहे.फोटोत माय-लेक दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. फोटोत काजोलने मुलगा युगला मिठी मारुन पोज दिली आहे.

अजय देवगणनेही युगसोबत एक पोस्ट शेअर केली असून त्यासोबत एक सुंदर नोटही लिहिली आहे. फोटोत, अजय मुलगा युगसोबत कारंज्याजवळ बसला आहे आणि त्याच्याकडे प्रेमाने बघत आहे. फोटो शेअर करत अजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्यातील सर्वोत्तम भाग म्हणजे तुझ्यासोबत मोठे होणे. दिवसभर बाप-लेकाची कामे करणे, एकसाथ शो पाहणे, व्यायाम करणे, गप्पा मारणे आणि एकत्र प्रवास करणे. वाढदिवसाच्या शुभेच्छा युग.” फोटोमध्ये, युग पांढर्‍या रंगाच्या पोशाखात खूपच क्यूट दिसत आहे, तर अजय देवगणने निळी जीन्स आणि निळा टीशर्ट घातला आहे.

काजोल आणि अजयच्या पोस्टवर खूप कमेंट आणि लाइक्स येत आहेत. तसेच युजर्स युगला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत.