अजय देवगणची लेक न्यासाच्या बोल्ड फोटोंनी इंटरने...

अजय देवगणची लेक न्यासाच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं (Ajay Devgan’s Daughter Nyasa’s Bold Avatar Raised The Internet’s Mercury)

अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol) यांची लेक न्यासा (Nyasa Devgan) बॉलीवूडची फॅशनेबल आणि लोकप्रिय स्टार किड्स (Star Kid) म्हणून सतत सगळ्यांच्या नजरेत येऊ लागली आहे. न्यासा अजूनही चित्रपटांपासून दूर असली तरी, मीडियामध्ये न्यासाची बऱ्यापैकी चर्चा आहे. आज ती स्टार नसली तरी न्यासाच्या नावाने इंस्टाग्रामवर अनेक फॅन पेजेस आहेत. यावरून न्यासाची लोकांना किती क्रेझ आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Nyasa Devgan

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

न्यासा देवगणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये न्यासा तिच्या काही मित्रांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसते आहे. फोटोत न्यासाने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि वेगळी दिसत आहे. तिच्या या लूकचे चाहते कौतुक करत आहेत.

Nyasa Devgan

न्यासाच्या या फोटोवर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कोणी तिला खूप क्यूट म्हटले आहेत तर कोणी गॉर्जेस म्हटले आहे. न्यासाला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोलिंगला बळी पडावे लागले असले तरी यावेळी मात्र तिच्या लूकने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या छायाचित्राशिवाय दुसऱ्या एका छायाचित्रात न्यासा काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. न्यासाचा हा फोटो तिच्या एका फॅन क्लबने पोस्ट केला आहे.

न्यासाला बॉडीकॉन किंवा बॉडीफिट कपडे घालणे आवडते. याशिवाय शॉर्ट्स घालायलाही तिला खूप आवडते. वेशभूषेमुळे अनेकवेळा ट्रोलर्स न्यासाला लक्ष्य बनवतात, पण न्यासा आपला बिनधास्तपणा काही सोडत नाही. न्यासाचा हा आत्मविश्वास तिच्या ड्रेसिंग सेन्समधून स्पष्टपणे दिसून येतो. ती हरतऱ्हेच्या ड्रेसमध्ये सुंदर आणि परफेक्ट दिसते.

न्यासा देवगण सध्या सिंगापूरमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. मुंबईतील धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. न्यासाचा जन्म २० एप्रिल २००३ रोजी मुंबईत झाला होता. न्यासाच्या १८ व्या वाढदिवशी, काजोलने न्यासासोबतचा एक गोंडस फोटो पोस्ट केला होता. या पोस्टच्या माध्यमातून काजोलने पहिल्यांदा आई होण्याचा अनुभव सांगितला होता.