शिवभक्त अजय देवगणच्या छायाचित्रांचे चाहत्यांकडू...

शिवभक्त अजय देवगणच्या छायाचित्रांचे चाहत्यांकडून कौतुक (Ajay Devgan Wishes Fans Mahashivaratri; Fans Appreciated)

अजय देवगणने महाशिवरात्री निमित्त आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत आपली अनोखी छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्याचे चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. छायाचित्रामध्ये अजयच्या पाठीवर त्रिशुळाचा टॅटू बनविण्यात आला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या फोटोबरोबरच अजयने ‘शिवाय’ या आपल्या चित्रपटातील गाण्यांच्या काही ओळी उद्धृत केल्या आहेत. ‘ना आदि ना अंत है उसका वो सबका, न इनका न उनका। वही शून्य है, वही इकाई। जिसके भीतर बसा शिवायः।’ अजय हा शिवभक्त आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात भगवान शिवाचे गाणे असावे, याबद्दल तो प्रयत्नशील असतो. त्याने आपल्या छातीवर शंकराच्या चेहऱ्याचा टॅटू देखील बनवून घेतला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
संजय लीला भन्साली यांच्या टगंगूबाई काठियावाडीट या चित्रपटात अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसेल. तर ‘मेडे’ या विचित्र नावाच्या चित्रपटात तो अमिताभ बच्चन सोबत दिसेल.

महाशिवरात्री स्पेशल : अभूतपूर्व केदारनाथ