अजय देवगणने घेतला ६० कोटी रुपयांचा बंगला (Ajay ...

अजय देवगणने घेतला ६० कोटी रुपयांचा बंगला (Ajay Devgan Buys A New Bungalow Worth Rs. 60 Cr.)

अजय देवगणने मे महिन्यात मुंबईच्या जुहू परिसरात एक नवा बंगला विकत घेतला असून त्याची किंमत जवळपास ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

जुहू परिसर म्हणजे बॉलिवूडचे सितारे यांच्या निवासस्थानाचा बालेकिल्ला आहे. अमिताभ बच्चनचे ३ बंगले इथे आहेत. तर धर्मेन्द्र, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, हृतिक रोशन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आदी मंडळी या परिसरात राहतात.

खुद्द अजय देवगणचा देखील शक्ती नावाचा बंगला जुहू परिसरात आहे. आता या घराजवळच म्हणजे कपोल को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत अजयने हा ६० कोटी रुपयांचा बंगला घेतल्याने, ही मोठी बातमी झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून अजय अशा बंगल्याच्या शोधात होता. अखेरीस त्याला हा ५९० चौरस यार्ड क्षेत्रफळाचा बंगला मिळाला. सदर नवा बंगला अजय आणि त्याची आई वीणा यांच्या संयुक्त नावावर खरेदी करण्यात आला आहे. खरं तर या बंगल्याची किंमत विकणाऱ्याने ६५ ते ७० कोटी सांगितली. पण गेल्या वर्षभरापासून करोनाच्या साथीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली असल्याने अजयला तो सवलतीच्या दराने म्हणजे ६० कोटीला मिळाला आहे.

सध्या अजय ‘शक्ती’ बंगल्यात आपली पत्नी काजोल आणि न्यासा व युग या दोन मुलांसह राहतो.