‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाचे पहिले परीक्...

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाचे पहिले परीक्षक म्हणून दिसणार ‘अजय अतुल’; भित्तिचित्राद्वारे पुण्यात केली घोषणा! (‘Ajay Atul’ Announces The first ‘Indian Idol Marathi’ Judges Through A Grand Wall Painting!)

सोनी मराठी वाहिनीने कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इंडियन आयडल हा मंच मराठीत आणला आहे. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. अन्‌ या दर्जेदार कार्यक्रमाचे पहिले परीक्षक म्हणून संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल दिसणार आहेत.  

 

Ajay Atul, Indian Idol Marathi

अजय-अतुल या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर आपल्या संगीताचं  गारुड घातलं आहे. या जोडीनं आपल्या सांगितीक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि म्हणूनच पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे या परिक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अशा प्रकारे परिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.

Ajay Atul, Indian Idol Marathi

पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकाराने हे भित्तिचित्र काढलं आहे. ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.