सतत मुलीचा हात का पकडून असतेस या प्रश्नाचे ऐश्व...

सतत मुलीचा हात का पकडून असतेस या प्रश्नाचे ऐश्वर्या रायने दिले चोख उत्तर (Aishwarya Replies Sharply As To Why She Always Hold Aardhya’s Hand?)

आपल्या फॅशन आणि मेकअपमुळे सतत ट्रोल होणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. पण सध्या ती वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होत आहे. ऐश्वर्या कुठेही गेली तरी ती आपली लेक आऱाध्या बच्चनला सोबत घेऊनच फिरते. विशेष म्हणजे आराध्यासोबत असताना तिचा हात ऐश्वर्याच्या हातात घट्ट पकडलेला असतो.


आराध्या आता 12 वर्षांची झाली आहे तरीही ऐश्वर्या कुठेही जाताना तिचा हात पकडून असते. यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जाते. ऐश्वर्या आपल्या मुलीला जराही मोकळीक देत नाही असे अनेक युजर्सचे म्हणणे आहे. अशातच ऐश्वर्याने ती आपल्या मुलीचा हात का पकडते याचा खुलासा केला आहे.


ऐश्वर्या म्हणाली की, मी माझ्या मुलीच्याबाबतीत खूप संरक्षक आहे. तिने लहानपणापासूनच प्रसिद्धी पाहिली आहे. बऱ्याचदा मी फोटोसाठी आनंदाने पोज देत असते. परंतू एकदा आऱाध्या लहान असताना मी माझ्याच तंद्रीत फोटो काढत होते. तेव्हा आराध्या खाली पडली होती.
प्रत्येकजण सुरक्षित असावा तसेच माझे बाळही सुरक्षित असावे असे माझी इच्छा आहे. व्हिडिओग्राफर्ससोबतच इतरही अनेक लोक तिच्या आजूबाजूला असतात. ती खूप लहान आहे. तिला लोकांच्या धक्क्यापासून वाचवावे लागते. एक पालक म्हणून मला माझ्या मुलीची सुरक्षितता महत्वाची वाटते. त्यामुळेच मी तिला कायम माझ्याजवळ ठेवते.