देवदासच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या रायच्या कानात...

देवदासच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या रायच्या कानातून आले होते रक्त (Aishwarya Rai’s Ear Started Bleeding During The Shooting Of ‘Devdas’)

शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांचा ‘देवदास’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम तर मिळालेच पण समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. त्या काळात या चित्रपटाला अनेक मोठे पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ हे सुपरहिट गाणे खूप गाजले. गाण्यातील माधुरी आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त डान्सने सर्वांना वेड लावले. मात्र या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या रायच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यावेळी तिच्या कानातून रक्त वाहत होते. मात्र तरीही अभिनेत्रीने न थांबता गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.

ऐश्वर्या रायने ‘देवदास’ चित्रपटात पारोची भूमिका साकारली होती. या गाण्यादरम्यान ऐश्वर्याला आपल्या कानात खूप जड झुमके घालावे लागले होते, त्यामुळे तिच्या कानाला डान्स करताना गंभीर दुखापत झाली होती आणि तिच्या कानातून प्रचंड रक्त वाहू लागले होते.ऐश्वर्याच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला पण तिने न थांबता संपूर्ण शूट पूर्ण केले. शूटिंग संपल्यानंतरच तिने नाचणे बंद केले.

विशेष म्हणजे संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाच्या कोरिओग्राफीपासून ते सेटची सजावट आणि आउटफिट्सपर्यंत सर्व काही खूप महाग होते. चित्रपटातील ‘काहे छेडे मोहे’ या गाण्यासाठी माधुरी दीक्षितसाठी बनवलेल्या आउटफिटचे वजन 30 किलो होते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला तो पोशाख घालून नाचणे खूप अवघड जात होते. मात्र असे असतानाही तिने शानदार कामगिरी केली.

‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित प्रेग्नंट होती. असे असूनही तिने कोणतीही अडचण येऊ न देता चित्रपटाचे शूटिंग केले. माधुरीने ‘काहे छेदो मोहे’ गाण्यासाठी घातलेला घाघरा अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता. त्याची किंमत 15 लाखांपेक्षा जास्त होती.

‘देवदास’ चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे तर हा चित्रपट सुमारे 50 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. चित्रपटासाठी 6 सेट तयार करण्यात आले होते, त्यातील सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या चित्रपटातील चंद्रमुखी म्हणजेच माधुरी दीक्षितसाठी तयार केलेल्या सेटची किंमत १२ कोटी रुपये होती. तर दुसरीकडे पारो म्हणजेच ऐश्वर्या रायची खोली बनवण्यासाठी 1.22 लाख काचेच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला होता, त्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये होती.