ऐश्वर्याने बोलून दाखवली पती अभिषेक बच्चनसोबत का...

ऐश्वर्याने बोलून दाखवली पती अभिषेक बच्चनसोबत काम करण्याची इच्छा, म्हणाली, कुटुंब हीच माझी पहिली प्रायोरिटी… (Aishwarya Rai Wants To Work With Abhishek Bachchan Again But Says ‘Family Is Priority’)

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने, पती अभिषेक बच्चनसोबत सिनेमात काम करण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. या दोघांनी यापूर्वी रावण, ढाई अक्षर प्रेम के आणि कुछ ना कहो यांसारखे चित्रपट एकत्र केले आहेत. गुरू या चित्रपटामध्ये ते दोघे शेवटचे एकत्र दिसले होते.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये, जेव्हा ऐश्वर्याला तू अभिषेक बच्चन सोबत काम करु इच्छीते का असे विचारले असता तिने आशेने वर पाहिले अन्‌ ‘असं व्हायला पाहिजे’ असे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी आयफा २०२२ च्या सोहळ्यात अभिषेक बच्चनचा डान्स परफॉर्मन्स होता. आपल्या पतीचा जबरदस्त डान्स पाहून एक्सायटेड झालेल्या ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन त्यांच्या सीटवर बसल्याबसल्या डान्स करू लागल्या होत्या.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी चित्रपटात एकत्र काम करून बरेच दिवस झाल्याने त्यांचे चाहते पुन्हा एकदा त्यांना सिनेमात एकत्र पाहू इच्छीत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या या उभयतांनाही एकत्र चित्रपटात काम करायचे आहे, परंतु ते योग्य वेळ आणि चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहताहेत.

ईटाइम्सशी बोलताना ऐश्वर्या रायने सांगितले की, तिच्या आगामी पोनीइन सेल्वन या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटामध्ये ती नंदिनी आणि मन्दाकिनी अशा डबलरोल मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या थलाइवर १६९ या सिनेमातही ती दिसणार आहे.  

आपल्या प्रोजेक्टबद्दल बोलताना ती म्हणाली की, सध्या तिचे कुटुंब आणि तिची मुलगी ही तिची प्रथम जबाबदारी असल्याने ती काही मोजक्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. मणि सरांच्या पोनीइन सेल्वनसाठी मी बाहेर पडली असली तरी माझं लक्ष माझ्या कुटुंबाकडे आणि मुलीकडेच लागलेलं असतं.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)