ऐश्वर्या रायला बनायचे होते डॉक्टर, जाणून घ्या अ...

ऐश्वर्या रायला बनायचे होते डॉक्टर, जाणून घ्या अभिनेत्री संबंधी काही रहस्ये (Aishwarya Rai Wanted To Become A Doctor Not An Actress, You Would Not Know These Secrets Related To Her Life)

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वीच खूप प्रसिद्ध झाली होती. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिने 1997 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर ती देशातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक बनली.

पण ऐश्वर्या रायला अभिनेत्री होण्याआधी डॉक्टर व्हायचे होते. आज आम्‍ही तुम्‍हाला ऐश्‍वर्या रायच्‍या आयुष्‍यातील काही गुपितांबद्दल सांगणार आहोत, ज्‍याबद्दल तुम्‍हाला क्वचितच माहिती असेल.शालेय जीवनात ऐश्वर्या राय खूप हुशार विद्यार्थिनी होती. त्यामुळे ती आपल्या करीअरबद्दलही खूप गंभीर होती.

ऐश्वर्या रायने एकदा सिम्मी ग्रेवालच्या शोमध्ये सांगितले होते की ती वैद्यकीय शिक्षण घेत होती. मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की माझा आवडता विषय झुओलॉजी होता तसेच मला वैद्यकीय क्षेत्रात करीअर करायचे होते.

इतकेच नाही तर मला आर्किटेक्ट सुध्दा व्हायची इच्छा होती. त्यासाठी मी रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश देखील घेतला होता, परंतु नंतर मॉडेलिंगमधील करीअरमुळे मला ते शिक्षण अर्धवट सोडावे लागले.चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी ऐश्वर्या राय एक यशस्वी मॉडेल होती.

1994 मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आणि ती जगभरात प्रसिद्ध झाली. 1997 पर्यंत ती मॉडेलिंग करत होती. यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऐश्वर्याने ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करीअरला सुरुवात केली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ऐश्वर्या लोकांच्या मनात घर करून गेली.तमिळ चित्रपटानंतर 1997 मध्ये तिने ‘और प्यार हो गया’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याच वर्षी तिला संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपट काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने ती यशाच्या शिखरावर चढली. यानंतर तिने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत राहिली. 2010 नंतर ऐश्वर्याने 5 वर्षांचा ब्रेक घेतला आणि त्यानंतर 2015 मध्ये ती ‘जज्बा’ चित्रपटातून परतली.ऐश्वर्या रायला 11 नामांकनांमध्ये 2 फिल्मफेअर पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. एवढेच नाही तर 2009 मध्ये तिला पद्मश्री आणि 2012 मध्ये आर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.