ऐश्वर्याच्या राणी नंदिनीच्या लूकसाठी १८ कारागीर...

ऐश्वर्याच्या राणी नंदिनीच्या लूकसाठी १८ कारागीरांची सहा महिन्यांची मेहनत (Aishwarya Rai In Ponniyin Selvan Look 18 Craftsmen Work Hard 6 Month Duration)

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही आता तिच्या पोनियन सेल्वन नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तिचा या चित्रपटातील राणी नंदिनीचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चाहते ऐश्वर्याच्या या लूकचे तोंडभरून कौतूक करत आहेत. मणिरत्नम यांचे दिग्दर्शन असलेल्या पोनियन सेल्वनमध्ये (Ponniyin Selvan) ऐश्वर्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याची त्या चित्रपटातील वेशभूषा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही व्हायरल झाल्या आहेत.

पोनियन सेल्वनमध्ये ऐश्वर्या ही पझुवरची राणी नंदिनीची भूमिका करणार आहे. त्यातील तिचा लूक नेटकऱ्यांना भावला आहे. मात्र ऐश्वर्याच्या या लूकसाठी त्यावर काम करणाऱ्या कारागीरांना मोठी मेहनत करावी लागली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चियान विक्रम याची पोन्नियन सेल्वन 1 मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याचा टीझर आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांची त्याला मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात ऐश्वर्याच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

ऐश्वर्याला राणी नंदिनी करण्यासाठी १८ कारागीर ६ सहा महिने मेहनत घेत होते. असे सांगण्यात येत आहे. यातून पोनियन सेल्वनचं बजेट आणि त्याची होणारी निर्मिती याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. आयएएनएसनं दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याची ती वेशभूषा तयार करण्यासाठी तीन डिझायनरची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ कारागीर सहा महिने मेहनत घेत होते.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा नंदिनी लूक प्रचंड व्हायरल होत आहे. हैद्राबादच्या किशनदास कंपनीच्या माध्यमातून ती डिझाईन तयार करण्यात आली आहे. नंदिनीच्या त्या लूकमध्ये वापरण्यात आलेली आभूषणं, वस्त्रं, ही प्रचंड महागडी असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेझरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.