ऐश्वर्या राय बच्चनने, अभिषेक आणि आराध्या सोबत स...

ऐश्वर्या राय बच्चनने, अभिषेक आणि आराध्या सोबत साजरा केला आईचा ७०वा वाढदिवस (Aishwarya Rai Celebrates Her Mother’s 70th Birthday With Abhishek Bachchan And Aaradhya, Shares Photos)

ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसली तरी आपल्या कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस असो, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असो, असे खास प्रसंग ती उत्साहाने साजरे करते आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करते.

काल २३ मे रोजी ऐश्वर्याच्या आई बृंदा राय यांचा ७०वा वाढदिवस होता. या साजिऱ्या क्षणी ऐश्वर्याने सुंदर फोटोंसह आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

लॉकडाउन असल्यामुळे ऐश्वर्याने, अभिषेक बच्चन आणि बेटी आराध्या बच्चनसोबत आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर या फोटोंना विशेष पसंती दर्शविली जात आहे.

पहिल्या फोटोमध्ये ऐश्वर्या रायने आई आणि आराध्यासोबत आपला एकमेकांना जादुची झप्पी देणारा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत ऐश्वर्याने लिहिलंय – ‘ ७०व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डियरेस्ट डार्लिंग मॉमी-डोडा. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू आमचं जग आहेस.’

दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्याच्या आई आणि मुलगी आराध्या दिसत आहेत. या फोटोची कॅप्शन आहे – ‘हॅप्पी हॅप्पी बर्थडे ॲन्ड लव्ह यू मॉमी डोडा.’

ऐश्वर्या, आराध्या आणि बृंदा राय सोबत अभिषेक बच्चन असलेल्या तिसऱ्या फोटोसही तिने आईला हॅपी बर्थडे असं लिहिलं आहे.

बृंदा राय मुंबईत राहत असून बरेचदा त्या ऐश्वर्याला भेटण्यास जातात. ऐश्वर्याही कुटुंबियांच्या खास क्षणांचे फोटो नेहमीच शेअर करते. यापूर्वीही तिने आपल्या आई-वडिलांसोबत आराध्याचा फोटो शेअर केला होता आणि आपलं कुटुंब हेच आपलं जीवन असल्याचं म्हटलं होतं.