वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने आपल्या मुलीसोबत ...

वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने आपल्या मुलीसोबत घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन (Aishwarya Rai Bachchan visits Siddhivinayak Temple on birthday with daughter Aaradhya Bachchan, Seeks Bappa’s Blessings)

अभिनेत्री  ऐश्वर्या राय बच्चनने काल आपला 49 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी, चाहते आणि कुटुंबीयांनी ऐश्वर्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

ऐश्वर्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात अनोख्या अंदाजात केली. त्यासंदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आपल्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या आपली मुलगी आराध्याला घेऊन मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेली होती. तिथे त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले.

व्हायरल झालेल्या फोटोत मायलेकी हातात पूजेचे सामान घेऊन गणपतीच्या पाया पडत आहेत.

मंदिरातील काही फोटो व्हायरल झाले त्यात मंदिरातील भटजी ऐश्वर्या आणि आराध्याला आशीर्वाद देत आहेत.

ऐश्वर्यानेसुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर सिद्धीविनायकाच्या दर्शनाचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच चाहते आणि हितचिंतकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत.

ऐश्वर्याची सिद्धीविनायकावर खूप श्रद्धा आहे. ती अनेकदा सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला जात असते. एवढेच नाही तर संपूर्ण बच्चन कुटुंब सिद्धीविनायकाचे भक्त आहेत. बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा अनेकादा बाप्पाच्या दर्शनाला येत असतात.

ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच ती मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 1 या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत.