अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या अडचणीत वाढ, अभ...

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या अडचणीत वाढ, अभिनेत्रीच्या घरी पाठवली नोटीस(Aishwarya Rai Bachchan is in trouble, Because of This Notice Has Been Sent to Actress’s House)

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची संपूर्ण जगाला भूरळ आहे. ऐश्वर्याचे सौंदर्यप्रेमी जगभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. अभिनेत्री चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता ऐश्वर्या राय एका नव्या अडचणीत सापडली असून अभिनेत्रीच्या नावाने तिच्या घरी नोटीस पाठवण्यात आली आहे.

तसे पाहायला गेल्यास ऐश्वर्या सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि मुलगी आराध्याला सांभाळण्यातच व्यस्त असते. आता ऐश्वर्या रायच्या घरी इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. अभिनेत्रीने टॅक्स न भरल्यामुळे तिला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिन्नरच्या तहसीलदारांनी ऐश्वर्या राय बच्चनला नोटीस पाठवली आहे.

नाशिकमधील सिन्नर येथील आडवाडी भागात ऐश्वर्या रायची जमीन असून, त्यावर एका वर्षासाठी २१,९६० रुपये कर थकित आहे. कर न भरल्याने ऐश्वर्या रायला तहसीलदारांच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे.ऐश्वर्या रायने सिन्नरच्या ठाणगावजवळ आडवाडी येथील डोंगराळ भागात सुमारे 1 हेक्टर जमीन घेतली आहे, परंतु अभिनेत्रीने वर्षभरापासून त्याचा कर भरलेला नाही. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला थकबाकीदार कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

ऐश्वर्यासोबतच १२०० मालमत्ताधारकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.नोटीस पाठवण्याची ही कारवाई महसूल विभागाने केली असून मार्च अखेर महसूल विभागा कर भरण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तसे, या नोटिस प्रकरणावर अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याने पवन ऊर्जा निर्मिती कंपनी सुझलॉनमध्ये गुंतवणूक केली आहे.अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती काही महिन्यांपूर्वीच मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्व न 1 या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.