अथिया शेट्टी आणि के.एल. राहुलचं विवाहस्थळ लग्ना...

अथिया शेट्टी आणि के.एल. राहुलचं विवाहस्थळ लग्नाआधीच झालं लीक, पाहा फोटो(Ahead of Athiya Shetty-KL Rahul Wedding, Venue Video Leaked, Suniel Shetty’s Khandala Farmhouse Decks Up In Golden)

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांचा आज विवाहसोहळा पार पडणार आहे. हा सोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर होणार असल्याचे बोलले जाते. सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसला नवरीसारखे सजवण्यात आले आहे.

लग्नाआधीच अभिनेत्याच्या खंडाळा फार्महाऊसच्या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पापाराझी अकाउंटवरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसचा आहे.

लग्नासाठी फार्महाऊस वधूप्रमाणे सजवले आहे. फार्म हाऊसमध्ये मोठे मंडप तयार करण्यात आले आहे. हे मंडप सोनेरी आणि पांढर्‍या रंगाने सजवण्यात आले आहे.

 अथिया आणि राहुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितले नाही. अथिया अनेकदा केएल राहुलला मॅचच्या वेळी स्टेडियम मध्ये दिसली होती. अनेकदा अथिया राहुलसोबत मस्ती करतानापण दिसली आहे.