लग्नानंतर दोन वर्षांनी मीरा राजपूतने सेक्सबाबत ...

लग्नानंतर दोन वर्षांनी मीरा राजपूतने सेक्सबाबत केला होता मोठा गौप्यस्फोट, जे ऐकून शाहिदच्या चेहऱ्यावरचा उडाला होता रंग… (After Two Years of Marriage, Mira Rajput Made Shocking Disclosure About Sex, Shahid Kapoor was Also Stunned)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली असून दोघांना मीशा आणि जैन अशी दोन मुलं आहेत. शाहिद आणि मीरा यांच्यामध्ये १३ वर्षांचं अंतर असून दोघांमधील कमालीची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनाही त्यांचे कौतुक वाटते. ही दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात अतिशय सुखी आहेत. पण लग्नाच्या अवघ्या २ वर्षानंतर मीराने सेक्सबाबत एक गौप्यस्फोट केला होता, जो ऐकून शाहिद कपूर स्वतः थक्क झाला. अखेर मीरा काय म्हणाली की, जे ऐकून शाहिदच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, जाणून घेऊया.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

वास्तविक, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लग्नाच्या दोन वर्षांनंतर चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. या शोमध्ये करण जोहरच्या प्रश्नाला उत्तर देताना मीरा राजपूतने, त्यांनी कारमध्ये सेक्स केल्याचे मान्य केले. मीराचे ते बोलणे ऐकून खुद्द शाहिदही चकित झाला होता.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

करण जोहरने शोमध्ये मीरा आणि शाहिदला विचारले होते की, त्यांनी कधी कारमध्ये सेक्स केला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मीरा म्हणाली होती – ‘होय, आम्ही कारमध्ये सेक्स केला आहे.’ मीराचे ते उत्तर ऐकून शाहिदची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याने आश्चर्याने मीराकडे पाहत, हे कधी झाले? असे विचारले.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

शोमधील चॅट दरम्यान, जेव्हा करणने जोडप्याला त्यांच्या बेडरूमचे रहस्य विचारले तेव्हा शाहिदने कबूल केले की तो अनेकदा घरात नग्न झोपतो. याला सहमती देत ​​मीरानेही झोपताना तुम्ही आरामात असायला हवे, असे म्हटले होते.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

करणने पुढे मीराला विचारले की, ‘जर तुमचे लग्न तुटले तर त्याचे कारण काय असेल? फसवणूक, सासरच्या मंडळींची ढवळाढवळ, वाईट लैंगिक संबंध की मग एकमेकांचा कंटाळा…?’ यावर प्रतिक्रिया देताना मीरा म्हणाली होती, ‘आमच्या संसारात सासरच्या मंडळींचा हस्तक्षेप नसतोच. आमच्यातील लैंगिक संबंधही चांगले आहेत आणि आम्हाला एकमेकांचा कंटाळाही आलेला नाही. अशा परिस्थितीत लग्न तुटले तर त्याचे एकच कारण असू शकते ते म्हणजे फसवणूक.’

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

या शोमध्ये शाहिदने सांगितले होते की, तो त्याच्या पत्नीला खूप घाबरतो, कारण त्याला रात्रीही मीराचे लेक्चर ऐकावे लागते. जर तो रात्री उठून टॉयलेटला गेला आणि टॉयलेट सीट वर करून खाली करायला विसरला तर त्याला खूप लेक्चर ऐकावे लागते. त्यांनी सांगितले की, यासाठी मीरा शिष्टाचाराचे धडे देऊ लागते.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की शाहीद आणि मीरा त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. त्यांनी अरेंज्ड मॅरेज केले होते. लग्नापूर्वी ते कधीही डेटवर गेले नाहीत. अवघ्या तीन-चार भेटीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

असे म्हटले जाते की, वयाच्या मोठ्या अंतरामुळे मीरा आधी शाहिदशी लग्न करण्यास तयार नव्हती, पण जेव्हा तिच्या मोठ्या बहिणीने तिला समजावले तेव्हा तिने शाहिदशी लग्न करण्यास होकार दिला. लग्नाच्या वेळेश शाहिद ३४ वर्षांचा होता तर मीरा फक्त २१ वर्षांची होती. मात्र, वयात एवढे अंतर असूनही दोघेही एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत आहेत.