दोन लग्न , दोन घटस्फोट होऊनही आमिर खानला येतेय ...

दोन लग्न , दोन घटस्फोट होऊनही आमिर खानला येतेय त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण (After Two Marriage And Divorce, Aamir Khan recalls His First Love Affair, Reveals 1st Heartbreak Story)

आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत असून आमिर सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आमिरची दोन लग्नं झाली पण ती दोन्ही अपयशी ठरली. त्याने अलीकडेच त्याच्या पहिल्या ब्रेकअपची गोष्ट शेअर केली आणि त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले.

लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशन दरम्यान, आमिर खान सोशल मीडियावर संवाद साधत असताना, त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले. पहिल्या ब्रेकअपनंतर आपले काय हाल झाले याबद्दलची माहिती त्याने या संवादा दरम्यान दिली.

आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत पडद्यावर अनेकदा रोमान्स करणाऱ्या आमिर खानने यूट्यूबवर त्याच्या चित्रपटातील ‘फिर ना ऐसी रात आएगी’ हे रोमँटिक गाणे प्रदर्शित केले. या गाण्याची थीम पाहून आमिरलाही त्याचं पहिलं प्रेम आठवलं, ज्याच्या आठवणीत अभिनेता म्हणाला, ‘ज्यावेळेस मी टेनिस खेळायचो तेव्हाची गोष्ट आहे. ती पण माझ्यासोबत त्याच क्लबमध्ये होती आणि मला ती आवडू लागली होती. पण अचानक एके दिवशी मला कळले की ती तिच्या कुटुंबासह देश सोडून गेली आहे. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. पण सर्वात जास्त याचे वाईट वाटले की मला ती आवडते हे तिला कधीच समजले नाही. या ब्रेकअपमधून एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे मी एक चांगला टेनिसपटू झालो. काही वर्षांनी मी राज्यस्तरावर टेनिस खेळलो आणि टेनिस चॅम्पियन झालो.

आमिर खान त्याच्या चित्रपटांमध्ये जरी यशस्वी झाला असला तरी, पण वैयक्तिक आयुष्यात त्याला यश मिळाले नाही. आमिर खानची दोन लग्नं झाली. पण दोन्ही लग्नं यशस्वी होऊ शकली नाहीत. दोन्ही वेळा घटस्फोट झाला. आता तर त्याने स्वतः सांगितले आहे की त्याचे पहिले प्रेम देखील यशस्वी होऊ शकले नाही.

आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर, अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होईल.