मिमीच्या यशानंतर कृति सेननने स्वतःलाच भेट केली ...

मिमीच्या यशानंतर कृति सेननने स्वतःलाच भेट केली करोडोंची लक्झरी कार (After The Success Of Mimi, Kriti Sanon Gifted Herself A Car Worth Rs 2.43 Crore)

कृति सेनन सध्या आपल्या मिमी या चित्रपटाच्या यशामुळे अतिशय आनंदी आहे. चित्रपटातील सरोगेट मदरच्या भूमिकेसाठी कृतिची बरीच प्रशंसा होत आहे. या आनंदाच्या भरात तिने स्वतःलाच एक शानदार लग्झरी गाडी गिफ्ट केली आहे.

Kriti Sanon Gifted Herself A Car

कृतिच्या लक्झरी कारच्या कलेक्शनमध्ये आता आणखी एका कारची भर पडली आहे. कृतिने स्वतःसाठी मर्सिडीजची मायबाक जीएलएस ६०० ही कार खरेदी केली आहे. भारतात या कारची किंमत सध्या २.४३ कोटी आहे. कृति तिला मिळालेल्या यशामुळे खुश आहे. ही कार घेतल्यानंतर तिला स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटत आहे. अलिकडेच कृतिला तिच्या नव्या गाडीसोबत मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर पाहण्यात आलं होतं. याआधी अर्जुन कपूर आणि रणवीर सिंहने देखील ही गाडी विकत घेतली आहे.

Kriti Sanon Gifted Herself A Car

नेटफ्लिक्सवर २६ जुलैला कृतिचा मिमी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा दिसले होते. या चित्रपटातील कृतिच्या भूमिकेने दर्शकांना खूपच प्रभावित केले आहे, ज्यामुळे तिचे कौतुक होत आहे. कृतिच्या आगामी चित्रपटांमध्ये आदिपुरुष, बच्चन पांडे, भेडिया, गणपत आणि हम दो हमारे दो यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.