सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची शेवटची इन...

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय (After The Death Of Siddharth Shukla, His Last Instagram Post Is Becoming Fiercely Viral, Said This)

इंडस्ट्रीमधील चमकणारा तारा, सिद्धार्थ शुक्ला याने अखेरचा श्वास घेतल्यानंतर सर्वत्र शोकाकूल वातावरण आहे. सामान्य व्यक्तीपासून इंडस्ट्रीमधील कलाकारांपर्यंत सर्वच त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. कोणताही आजार नसताना एखाद्या व्यक्तीच्या अशा अचानक निघून जाण्यावर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे, परंतु सत्य हेच आहे की सगळ्यांच्या या आवडत्या स्टारने या जगाला कायमचा निरोप दिला आहे.

Siddharth Shukla, Last Instagram Post

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सिद्धार्थ शुक्ला त्याच्या कामाबाबत जेवढा सजग होता, तेवढाच तो सोशल मीडियावरही सक्रिय होता. आपली प्रत्येक गोष्ट सामान्य माणसापासून विशेष व्यक्तीपर्यंत या नेटवर्कद्वारे सहज पोहचवली जाते, हे त्याला चांगले ठाऊक होते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी म्हणा वा त्यांना आपला संदेश पाठवण्याच्या निमित्ताने म्हणा, तो नेहमीच सक्रिय असायचा.

Siddharth Shukla, Last Instagram Post

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर आता त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो किती दयाळू होता आणि लोकांचे कौतुक कसे करावे हे देखील त्याला चांगले माहीत होते, याचा प्रत्यय सिद्धार्थच्या या पोस्टवरून आपल्याला येतो. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २४ ऑगस्ट रोजी ही शेवटची पोस्ट केली होती. त्यांनी आपल्या पोस्टद्वारे फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले आहेत.

सिद्धार्थ शुक्लाने या पोस्टमध्ये हातात एक प्लेकार्ड पकडले आहे, ज्यावर त्यांनी लिहिले आहे, “#TheHeroesWeOwe.” या चित्रात अभिनेत्याने मरूम रंगाचा शर्ट घातला आहे. या पोस्टद्वारे त्यांनी फ्रंटलाइन वर्कर्ससाठी लिहिलं होतं की, “सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचं मनापासून आभार. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता. तासन्‌तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहू शकत नाहीत त्यांची सेवा करता. तूम्ही खरंच खूप धाडसी आहात. फ्रंटलाइनवर राहणे सोपे नाही, परंतु आम्ही तुमच्या प्रयत्नांची खरोखर प्रशंसा करतो. ”

Siddharth Shukla, Last Instagram Post

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टनं प्रत्येकाची मनं जिंकली आहेतच शिवाय सगळ्यांनाच भावूक केलं आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ शेवटचा दिसला होता. लोकांनी त्याच्या अभिनयावर आणि त्याच्यावरही खूप प्रेम केले. म्हणूनच तो “बिग बॉस 13” चा विजेता झाला. याशिवाय ‘खतरों के खिलाडी’चाही तो विजेता होता. तेव्हा सिद्धार्थ शुक्लाला रिअॅलिटी शोचा किंग म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.