हिरव्या साडीवर सेक्सी ब्लाउज घालून जान्हवी कपूर...

हिरव्या साडीवर सेक्सी ब्लाउज घालून जान्हवी कपूरने पॉपकॉर्न विकले, पण चाहते फिदा झाले तिच्या साध्या लूकवर(After Selling Popcorn In Green Saree-Bikini Blouse, Janhvi Kapoor Spotted At The Airport In A Simple Blue Suit, Actress Stuns In Ethnic Look)

जान्हवी कपूर आपल्या आगामी ‘मिली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशनचाच एक भाग म्हणून जान्हवी दिल्लीतील एका थिएटरच्या फूड काउंटरवर पॉपकॉर्न विकताना दिसली.

जान्हवीच्या हातातून पॉपकॉर्न घेण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक दिसत होते. काउंटरवर गर्दी झाली होती. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात अभिनेत्री हातात ग्लोव्हज घालून टबमध्ये पॉपकॉर्न भरून लोकांना देताना दिसत आहे.

यावेळी जान्हवीने हिरव्या रंगाची प्रिंटेड एम्ब्रॉयडरी साडी परिधान केली होती आणि त्यावर सोनेरी चमकदार बिकिनी ब्लाउज घातला होता. केस मोकळे सोडून ती अप्रतिम दिसत होती.

त्यानंतर जान्हवी पहाटे विमानतळावर दिसली. तेव्हा ती अगदी साध्या लूकमध्ये होती. तेव्हा अभिनेत्रीने निळ्या रंगाचा ड्रेस आणि पांढरी पँट घातली होती.

गळ्यात स्कार्फ घातला होता व केस मोकळे सोडले होते. अभिनेत्रीचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडला असून ते जान्हवीचे खूप कौतुक करत आहेत.

जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून तो एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. जान्हवीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसते.

स्वत: जान्हवीने असेही सांगितले की या थ्रिलर चित्रपटातील भूमिकेचा तिच्यावर इतका प्रभाव पडला की तिला भयानक स्वप्ने पडू लागली.