पत्नी पत्रलेखाचे चित्रविचित्र मिरर सेल्फी, राजक...

पत्नी पत्रलेखाचे चित्रविचित्र मिरर सेल्फी, राजकुमार रावने शेअर करताच, लोकांनी त्याचा धिक्कर केला (After Receiving Reactions From Trollers, Rajkummar Rao Deletes A ‘weird Mirror Selfie’ With His Wife Patralekhaa)

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याची बायको पत्रलेखा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. पण नुकतीच राजकुमारने तिचा असा विचित्र फोटो शेअर केला की लोकांनी त्याचा जाम धिक्कार केला. तेव्हा राजकुमारने हा फोटो इन्स्टाग्राम टाइमलाईन वरून काढला.

राजकुमारने पोस्ट केलेल्या या फोटोत पत्रलेखाने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. पण पोझ अशी विचित्र दिली आहे की, काय म्हणावं तेच कळत नाही. राजकुमारने आरशात बघून हा फोटो काढला आहे, अन्‌ म्हटलं की, ‘शीशा और शीशे में तस्वीर?’

या फोटोवर काही लोकांनी पसंती तर काही लोकांनी तीव्र नापसंती प्रदर्शित केली. पत्रलेखाची विचित्र पोझ पाहून लोकांनी राजकुमार वर टिकेचा भडिमार केला.

खरं म्हणजे पत्रलेखाची ती पोझ अगदी विचित्र वाटत होती. म्हणून लोकांनी तिची चांगलीच टवाळी केली. तेव्हा लोकांचे हे कमेंटस्‌ बघून राजकुमारने फोटो काढून टाकला.

राजकुमारचा ‘बधाई’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये भूमी पेडणेकर त्याची नायिका आहे.