रणवीर सिंहनंतर असीम रियाजही झाला न्यूड, फोटो पा...

रणवीर सिंहनंतर असीम रियाजही झाला न्यूड, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, रणवीरने सगळ्यांना बिघडवलं (After Ranveer Singh Now Asim Riaz Also Goes Nude, Fans Say, ‘Ranveer Bhaiya Ne Bigad Diya’)

रणवीर सिंह (Ranveer Singh) ने अलिकडेच एका मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट काय केले, तो जगप्रसिद्ध झाला. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाने त्याच्या फोटोंवर आपापली मते व्यक्त केली. जेवढी निंदा झाली तेवढीच जास्त प्रसिद्धीही त्याला मिळाली. आता रणवीरला पाहून प्रभावीत झालेल्या आणखी एका अभिनेत्याने न्यूड फोटोज्‌ शेअर करत धमाका केला आहे. आपले न्यूड फोटो प्रदर्शित करणारा दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस फेस असीम रियाज (Bigg Boss fame Asim Riaz) आहे.  

फिटनेस प्रेमी असीम रियाज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. वरचेवर तो त्याच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनातील फोटो शेअर करत असतो. आता रणवीरच्या न्यूड फोटोशूटने प्रभावित होत त्याने स्वतःच्या फोटोंची सीरिज आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. ज्यात तो अगदी मोजक्या कपड्यांत दिसत आहे. गमंत अशी आहे की, असीमने हे फोटोशूट रणवीर सिंहच्या आधीच शूट केले आहेत, परंतु आत्ता शेअर केले आहेत.

हे फोटो २०१७ साली शूट केलेले आहेत, ज्यात असीम शर्टलेस आणि अनजिप्ड जिन्समध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये तो त्याची पिळदार शरीरयष्टी फ्लॉन्ट करत आहे.

खरं तर असीमने यापूर्वीही अनेकदा शर्टलेस फोटो शेअर केले आहेत आणि तो आपली बॉडी फ्लॉन्ट करण्याची एकही संधी सोडत नाही, हे त्याच्या चाहत्यांनाही चांगलेच माहीत आहे. पंरतु २०१७ मध्ये फोटोशूट केलेले जवळजवळ न्यूड असे हे फोटो आत्ताच शेअर करण्यामागचे त्याचे टायमिंग पाहून चाहते खूश होत आहेत.

एका नेटकऱ्याने तर लिहिलंय, ‘रणवीर भाऊने सगळ्यांना बिघडवलं आहे.’ तर अनेकांनी त्याला ‘हॉट’ ‘सेक्सी’ यांसारख्या कमेंट्‌स दिल्या आहेत. आसिमच्या चाहत्यांना त्याचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत.

अलिकडेच रणवीरने एका मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केले होते, ज्यामुळे वादंग उठला होता. एकीकडे ‘महिलांच्या भावनांना ठेस पोहचवली गेली’ असा आरोप करत रणवीरच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्याच्याशी सहमत असलेल्यांनी त्याची प्रशंसा केली आहे.

आलिया भट्ट, परिणीति चोपड़ा, अर्जुन कपूर, उर्फी जावेद, विद्या बालन आणि राखी सावंत सारख्या अनेक सेलेब्रिटीजने यासाठी रणवीरला सपोर्ट केला, तर टी.व्ही. ॲक्टर नकुल मेहता याने रणवीरला सपोर्ट करण्यासाठी रणवीरचा न्यूड फोटो एडिट करून त्यावर स्वतःचा चेहरा लावून पोस्ट केला आहे.