उर्वशी रौतेलाने शेअर केला मुंबईतील हॉस्पिटलचा फ...

उर्वशी रौतेलाने शेअर केला मुंबईतील हॉस्पिटलचा फोटो, युजर्सने केले ट्रोल (After ‘praying’ Post, Urvashi Drops Pic Of Mumbai Hospital Where Rishabh Pant Is Admitted, User Said…)

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याला बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी ऋषभ पंतला पाहण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पोहोचली. यापूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

कोकिला बेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंतला भेटायला आलेल्या उर्वशीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो कोकिला बेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे आहेत, जिथे ऋषभ पंतवर उपचार सुरू आहेत. इन्स्टा स्टोरीवर हे फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी उर्वशीला ट्रोल करायला सुरुवात केली.

अभिनेत्रीचे हे फोटो पाहिल्यानंतर युजर्स असा अंदाज लावत आहेत की उर्वशी रौतेला ऋषभ पंतला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे.यामुळे युजर्स उर्वशी रौतेलाला चांगलेच ट्रोल करत आहेत.

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला पाहण्याच्या बहाण्याने बी-टाऊन अभिनेत्रीला लोकप्रियता मिळवायची आहे, असे सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत.

काहीजण उर्वशीला वेडी म्हणत आहेत, तर काही उर्वशीच्या या पद्धतीनं प्रसिद्धी मिळवण्याचा काय स्वस्त मार्ग आहे, असं म्हणत आहेत.

उर्वशीने शेअर केलेले फोटो पाहून युजर्स उर्वशीवर जोरदार टीका करत आहेत.