डेटिंग करत आहेत बबिता-टप्पू; हे ऐकून जेठालालचं ...
डेटिंग करत आहेत बबिता-टप्पू; हे ऐकून जेठालालचं मन झालं खट्टू! (After Munmun Dutta-Raj Anadkat’s Dating News Goes Viral Jethalal Feels Very sad)

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये बबीताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता खऱ्या आयुष्यात तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या राज अनादकतला डेट करत आहे. खरं म्हणजे या मालिकेत टप्पूचे वडील जेठालाल बबिताजींना प्रभावित करण्यात गुंतलेले असतात आणि बबिताजी त्यांच्याकडे बघतही नाही, असं दाखविलं आहे. अन् प्रत्यक्षात याच्या अगदी उलटे झाले आहे, वास्तविक जीवनात जेठालालला मागे टाकत टप्पूने बबिताला पटवलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमधील बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता, टप्पूच्या म्हणजेच राज अनादकतच्या प्रेमात आहे, जो याच मालिकेत जेठालालच्या मुलाची भूमिका साकारत आहे. आणि राज बबितापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.

म्हणूनच जेव्हापासून बबीताजी आणि टप्पूच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या आहेत, तेव्हापासून जेठालालला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. सीरियलमध्ये जेठालालला बबीताजी आवडत असल्याचे दाखवले असल्यामुळे, चाहते सोशल मीडियावर विविध मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत, बबिताआणि टप्पूच्या अफेअरमुळे जेठालालचं मन खट्टू झालं असल्याचं सांगत त्याची खिल्ली उडवत आहेत.

बातमीनुसार, राज आणि मुनमुन दत्ता यांच्यात खूप जवळचे नाते आहे आणि दोघेही एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. एवढेच नाही तर शोच्या सेटवरील इतर सर्व कलाकारांना तसेच दोघांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. परंतु सर्व सदस्यांनी त्यांच्या नात्याचा आदर केला आणि गोपनीयता राखली आहे.
