एमएमएस लीक झाल्यावर अंजली अरोरा गेली हाजी अली द...

एमएमएस लीक झाल्यावर अंजली अरोरा गेली हाजी अली दर्ग्याचे दर्शन घ्यायला, लोकांनी केले ट्रोल (After Leaked MMS Controversy Anjali Arora Gets Brutally Trolled For Visiting Haji Ali Dargah, Netizens Say ‘Sau Chuhe Khake Billi Chali Haj Ko’)

कच्चा बदाम आणि लॉक अप फेम अंजली अरोराचा अश्लील एमएमएस लीक झाल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी एक एमएमएस व्हायरल झाला होता ज्यामध्ये दिसणारी मुलगी ही अंजली अरोरा असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत अंजलीला विचारले असता ती ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की, ज्यात माझा संबंध नाही ते माझ्या नावाने का पसरवले जात आहे.

माझे नाव फक्त काही व्ह्यूज मिळविण्यासाठी वापरले जात आहे. माझे पण एक कुटुंब आहे, मला लहान भाऊ आहेत, हे सर्व पाहून आणि ऐकून त्यांना कसे वाटेल.सतत होणाऱ्या ट्रोलिंगला ती म्हणाली की, मला आता या गोष्टीचा फरक पडत नाही. मी या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही.

 अलीकडेच अंजली हाजी अली दर्ग्यात गेली होती. जिथे पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. अंजलीनेही त्यांच्यासाठी प्रेमाने पोज दिली पण लोकांनी अंजलीला खूप ट्रोल केले. तिचा  हाजी अली भेटीचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. लोक अजूनही तिला त्या व्हायरल एमएमएससाठी ट्रोल करत आहेत आणि कमेंट करत आहेत की, सर्व काही करून आता साधू बनत आहे… काहींनी  लिहिले ,तुमचा एमएमएस चांगला होता…

तर अंजलीच्या चाहत्यांनी मात्र तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हटले आहे.

अंजली एक टिकटॉक स्टार आहे आणि ती कच्चा बदामा या गाण्यासाठी खूप लोकप्रिय झाली होती, त्यानंतर तिला कंगनाच्या लॉक अप शोमध्ये मुनव्वरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळेही खूप ओळख मिळाली. आजकाल ती रोजच चर्चेत असते.