करीना, अमृता पाठोपाठ त्यांच्या गर्लगँगमधील महिप...
करीना, अमृता पाठोपाठ त्यांच्या गर्लगँगमधील महिप कपूर आणि सीमा खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह, बीएमसीने सील केले करीनाचे घर (After Kareena-Amrita Arora now Maheep kapoor And Seema khan also test positive for Covid-19, BMC seals Kareena’s house)

जगभरात ओमिक्रॉनच्या धोक्याबाबतच्या सूचना दिल्या जात असतानाच बॉलिवूडमध्ये मात्र पुन्हा एकदा कोरोनाची लागण सुरू झाली आहे. करोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. कालच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोराची (Amrita Arora ) करोना चाचणी पॉझिटिव्ह (Covid 19 Positive) आली. याचे कारण त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती, असे सांगितले जात आहे.

आता करीना, अमृता पाठोपाठ त्यांच्याच गर्ल गँगमधील आणखी दोन सुंदरी, संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान याही कोविड पॉझिटिव्ह झाल्या आहेत. महिप कपूर ही ज्वेलरी डिझायनर आहे. अन् सीमा खान ही फॅशन डिझायनर आहे. त्या दोघीही नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये दिसल्या होत्या. तर रिपोर्ट्सनुसार दोघांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसली असून त्यांनी स्वतःला घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे.

काल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले होते – “मी कोविड पॉझिटिव्ह झाली आहे. मी ताबडतोब स्वतःला क्वारंटाइन केले आहे आणि सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्यावी. माझे कुटुंब आणि माझे कर्मचारी आमचे दुहेरी लसीकरण झालेले आहे आणि त्यांच्यापैकी कोणालाही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मी देखील बरी आहे आणि लवकरच पूर्णपणे बरी होईन.”

सध्या बीएमसीने करिनाचे घर सील केले आहे. बीएमसीचे म्हणणे आहे की करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी यापूर्वी कोविड नियमांचे उल्लंघन करून अनेक पार्ट्या केल्या आहेत. म्हणूनच बीएमसीने करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना RT-PCR चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

ओमिक्रॉन विषाणूमुळे पालिकेने अनेक निर्बंध लावले आहेत. तरी देखील सेलिब्रिटींकडून बऱ्याचवेळा त्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करण जोहर राहत असलेल्या इमारतीत आणि परिसरात देखील करोना संसर्ग चाचणी आणि स्क्रिनिंग सुरू केली आहे.