‘इकबाल’ नंतर श्रेयस तळपदे पुन्हा एक...

‘इकबाल’ नंतर श्रेयस तळपदे पुन्हा एका गोलंदाजाच्या चरित्रपटाचा नायक (After ‘Ikbal’, Shreyas Talpade Playing A Role Of Bowler In ‘Kaun Pravin Tambe’ Bioepic)

‘इकबाल’ हा क्रिकेट मधील जलदगती गोलंदाजांची भूमिका करून नावारूपास आलेला श्रेयस तळपदे आता आणखी एका गोलंदाजांची भूमिका करतो आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ या १ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात प्रवीण तांबे या लेग स्पिनरचे चरित्र मांडण्यात आले असून त्याचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. फ्रायडे फिल्म वर्क्स आणि बॉटम रूम प्रोडक्शन तर्फे हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडियोने सादर केला आहे.

सर्व साधारणपणे ऐन तरुण वयात क्रिकेटपटूची कारकीर्द सुरु होते. सचिन तेंडुलकर या जगविख्यात फलंदाजांची कारकीर्द तर वयाच्या १५ व्या वर्षीच सुरु झाली होती. परंतु प्रवीण तांबे हा असा एकमेव गोलंदाज आहे, ज्याची कारकीर्द वयाच्या ४१ व्या वर्षी सुरु झाली. राजस्थान रॉयल्सतर्फे तो पहिल्यांदा अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळाला. अन ही संधी मिळविण्यासाठी त्याची जिद्द, चिकाटी आणि क्रिकेटवरील प्रेम, अधोरेखित झाले. डिस्ने व हॉटस्टार वर हा चित्रपट हिंदी, तामीळ व तेलगू भाषेत आहे.
अशा या जिद्दी आणि विलक्षण गोलंदाजांची भूमिका श्रेयस तळपदे साकारतो आहे. त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणतो, ” ‘इकबाल’ नंतर १७ वर्षांनी मी पुन्हा क्रिकेटमधील नायकाची भूमिका करतो आहे. प्रवीण तांबेची भूमिका मला मिळाली याबद्दल मी सुदैवी आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मी प्रवीणच्या सहवासात राहिलो. ते क्षण माझे कायमच्या स्मृतीत राहतील. प्रेक्षक त्याची कहाणी पाहताना हेलावून जातील.”

खुद्द गोलंदाज प्रवीण तांबे याबाबत म्हणतात, “आपली स्वप्ने साकारण्यासाठी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांना प्रेरणा देईल, अशी मला खात्री आहे. मी व माझे कुटुंब या चित्रपटाचे प्रदर्शन पाहण्यास फारच उत्सुक आहोत.”