घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकत्र...

घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकत्र (After Divorce Aamir Khan and Kiran Rao Seen Together, Pic Goes Viral From The Set of This Film)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नुकताच त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. लग्नाच्या १५ वर्षांनंतर दोघांनी एकमताने स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. परंतु आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे झाले असलो तरी पालक म्हणून तसेच मित्र म्हणून आपलं नातं कायम ठेवणार असल्याचं दोघांनी सांगितलं होतं. सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो नुकतेच व्हायरल होत आहे. घटस्फोटानंतर दोघांचा हा एकत्र फोटो पाहून खरोखर दोघांमधील मैत्रीचं नातं टिकून असल्याची खात्री पटते. ही दोघं ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी एकत्र पाहण्यात आली असून आमिर व किरण राव यांचा सेटवरील हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

आमिर खान आणि किरण राव त्यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले असून त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. या चित्रात आमिर खान सैन्याच्या गणवेशात दिसत आहे. तर एक्स पत्नी किरण रावदेखील त्याच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. आमिर आणि किरण यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य देखील दिसत आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम
आमिर आणि किरण यांनी हा फोटो आमिर खान प्रॉडक्शन हाउसच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवरून शेयर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय – ‘बाला चे स्वागत आहे, सगळ्यांचं मन जिंकणारा. तुम्ही आधीच आमचं हृदय जिंकलं आहे. किरण आणि आमिर.’ हा फोटो अभिनेता नागा चैतन्यने देखील शेयर केला आहे.

दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आमिर खानच्या निर्मितीत तयार होत असलेल्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात नागा चैतन्य आमिर खानच्या मित्राची भूमिका साकारत आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम
दरम्यान फोटो पाहिल्यानंतर युजर्सच्या देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका युजरने लिहिलंय – लाल सिंह चड्ढा एक धमाकेदार आणि मास्टरपीस सिनेमा होणार आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय,- आमिर खान कृपया एका चांगल्या महिलेशी लग्न करा, मी तुम्हाला सपोर्ट करतो. युजर्सच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय की, आमिर आणि किरण यांचा घटस्फोट त्यांच्या चाहत्यांनी फारच गांभीर्याने घेतलेला आहे.