टायगर श्रॉफ – दिशा पटणी यांचे 6 वर्षांचे ...

टायगर श्रॉफ – दिशा पटणी यांचे 6 वर्षांचे प्रेमप्रकरण संपुष्टात (After Dating For Almost 6 Years, Tiger Shroff And Disha Patani Part Ways? Deets inside)

बॉलिवूडमध्ये एकमेकांच्या प्रेमात बुडालेले अनेक कपल आहेत. त्यातीलच एक म्हणजे दिशा पटणी आणि टायगर श्रॉफ. पण आता हे कपल वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. दोघांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केले. पण त्यांनी याबाबतचा कधीच खुलासा केला नव्हता. पण त्यांच्याकडे पाहून ते प्रेमात किती आकंठ बुडाले आहेत हे सहज लक्षात यायचे.

दोघांना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात, पार्ट्यांमध्ये तर काही वेळेस विमानतळावर एकत्र पाहिले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरेतर दोघांचे नाते वर्षाच्या सुरुवातीलाच तुटले होते. गेले वर्षभर त्यांच्यात खूप भांडणे होत होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. टायगर आणि दिशाने जरी त्यांच्या ब्रेकअप बद्दल सांगितले नसले तरी टायगरच्या एका मित्राने ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे.

टायगरच्या मित्राने सांगितले की, त्यालाही हे सर्व अलीकडेच समजले. टायगर त्याच्या मित्रांना याबाबत फारसे काही सांगत नाही. सध्या तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. नात्याचा किंवा ब्रेकअपचा त्याच्या कामावर कोणताही फरक पडलेला नाही.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दिशा आणि टायगरने एकमेकांच्या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रेकअपनंतरही त्यांची मैत्री कायम असल्याचे बोलले जाते. सध्याच्या काळात ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर अनेक जोडपी त्यांच्यातील मैत्री कायम ठेवतात असे दिसून येते.

दिशाचा एक व्हिलन रिटर्नस् तर टायगरचा गणपत आणि बागी 4 हे चित्रपट येणार आहेत.