घटस्फोटाच्या घोषणेनंतर आमिर खान – किरण रा...

घटस्फोटाच्या घोषणेनंतर आमिर खान – किरण राव यांनी आपल्या संबंधांबाबत सत्य प्रकट केले (After Announcement Of Divorce, Now Aamir Khan – Kiran Rao Tell The Truth Of Their Relationship)

आमिर खान व किरण राव यांनी घटस्फोट घेण्याची घोषणा करताच मिडियावर खळबळ माजली. घटस्फोट घेण्याची वेळ या आदर्श जोडीवर का आली असावी, या प्रश्नांनी चाहते अचंबित झाले होते. चाहत्यांना अधिक अंधारात न ठेवता, या जोडीने एका व्हिडिओमध्ये आपल्या संबंधांबाबत सत्य समोर मांडले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
आमिर खान व किरण एकत्र बसले आहेत. व्हिडिओमध्ये आमिर म्हणतो, ”तुम्हा लोकांना खूप दुःख झाले असेल, धक्का बसला असेल; पण आम्ही दोघेही आनंदात आहोत. आम्ही एकाच कुटुंबात आहोत. आमचं नातं बदललं आहे. पण आम्ही एकमेकांसोबतच आहोत. पानी फाऊंडेशन आम्हाला आझाद प्रमाणे आहे. आझाद हा जसा आमचा मुलगा आहे, तसंच पानी फाऊंडेशन आहे. आम्ही सदैव एक कुटुंब म्हणून राहू. आम्ही आनंदात राहावं, म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
१५ वर्षांचा आपला संसार आता मोडला आहे, असं निवेदन जेव्हा त्याने केलं होतं, त्यामध्ये म्हटलं होतं की, ”आम्ही दोघे भलेही वेगळे होत असलो तरी आपलं जीवन एका कुटुंबासारखंच जगू. आमचा मुलगा आझाद याच्यासाठी आम्ही समर्पित माता-पिता असणार आहोत. त्याचं पालनपोषण आम्ही मिळूनच करू.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
आमिर खानचं हे निवेदन सगळ्यांनाच चकित करणारं होतं. कित्येक वापरकर्त्यांनी त्याची निर्भत्सना केली होती. काहींनी तर असंही म्हटलं की, सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमाचा एक भाग असलेले आपले संबंध हा माणूस सांभाळू शकत नाही…