या कारणांमुळे सैफ अली खान त्याची हजारो करोडची स...

या कारणांमुळे सैफ अली खान त्याची हजारो करोडची संपत्ती आपल्या मुलांच्या नावे करु शकत नाही (After all, Why Saif Ali Khan Cannot Transfer His Property on The Names of Children, You Will be Surprised to know The Reason)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला पतौडी घराण्याचा दहावा वारस म्हटले जाते. अभिनयासोबतच सैफच्या संपत्तीचीही चर्चा होत असते.

सैफ पतौडी घराण्याचा नवाब असल्यामुळे त्याच्याकडे हजारो रुपयांची संपत्ती आहे हे जरी खरे असले तरी तो इच्छा असूनही ही संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करु शकत नाही. तसेच त्याची मुले देखील या संपत्तीवर हक्क बजावू शकत नाही. या मागील कारण ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

सैफकडे ५ हजार कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे बोलले जाते. हरियाणामधील पतौडी पॅलेस व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सुद्धा सैफची मालमत्ता आहे. ही सर्व संपत्ती आणि मालमत्ता सैफला त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून मिळाली आहे. वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर सैफनंतर त्याच्या चार मुलांचा हक्क असायला हवा मात्र सैफची इच्छा असूनही तो ही संपत्ती आपल्या मुलांच्या नावे करु शकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सैफच्या पतौडी पॅलेससोबतच त्याची इतर संपत्ती ही भारत सरकारच्या ‘शत्रू मालमत्ता कायदा’अंतर्गत येते. या कायद्या अंतर्गत या मालमत्तेवर कोणीही आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. आणि जर सैफची मुलं यावर हक्क बजावू इच्छितात तर त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागेल.

जर ते उच्च न्यायालयात केस जिंकले तरच ते मालमत्तेवर हक्क सांगू शकतात आणि ते हरले तर ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. तिथेही त्यांचे काम न झाल्यास त्यांच्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणे हाच शेवटचा पर्याय उरतो.

सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांचे आजोबा ब्रिटिश सरकारच्या काळात नवाब होते. सैफच्या पणजोबांनी आपल्या मालमत्तेबाबत कोणतेही मृत्युपत्र तयार केले नव्हते. त्यामुऴे या वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणी दावा करण्याचा प्रयत्न केला तरी पाकिस्तानात राहणारे त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य त्यावर आक्षेप घेऊन वाद निर्माण करू शकतात.

सैफ अली खानच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्याने आपल्याहून १३ वर्षांनी मोठ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले झाली.

मात्र, अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात करीना कपूर आली आणि दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. करीना कपूर खान सैफपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे,

लग्नानंतर करीनाने तैमूर अली खान आणि जेह अली खान या दोन मुलांना जन्म दिला. अशा प्रकारे सैफ चार मुलांचा बाप आहे आणि तो आपल्या सर्व मुलांची समान काळजी घेतो.