घटस्फोट घेतल्यानंतर ५ वर्षांनी फरहान अख्तर करतो...

घटस्फोट घेतल्यानंतर ५ वर्षांनी फरहान अख्तर करतोय शिबानी दांडेकरशी लग्न (After 5 Years Of Divorce, Farhan Akhtar To Marry Shibani Dandekar)

गेल्या काही वर्षांपासून डेट करणारे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर आत्ता मार्च महिन्यात लग्न करत आहेत.
आधी या जोडीने आपला विवाह समारंभ मोठया प्रमाणावर साजरा करायचे ठरवले होते; पण आता करोनाचे रुग्ण वाढत असलेले पाहून त्यांनी अतिशय खासगी समारंभात तो करण्याचे ठरले आहे. फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबिय या लग्नाला हजर असतील.

लग्नाची सर्व तयारी झाली आहे. तयासाठी पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले आहे. डिझायनर सब्यसाची यांचे ड्रेस ते दोघे घालतील. गेल्या काही वर्षांपासून फरहान व शिबानी लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत. दोघे सोशल मिडीयावर रोमॅन्टिक फोटो शेअर करतात. शिबानीने फरहानच्या नावाचा टॅटू आपल्या पाठीवर गोंदला आहे.

२००० साली फरहानने अधुनाशी लग्न केलं होत. पण १६ वर्षांनी ते वेगळे झाले. त्यांना शाक्य आणि अकिरा अशा दोन मुली आहेत. अधुनाला सोडल्यावर फरहानने, शिबानीशी सूत जमविले. आता या दोघांना सोशल मीडियावरील सर्वात ‘कूल कपल’ असे ओळखले जाते. पहिल्या बायकोशी घटस्फोट घेतल्यावर ५ वर्षांनी फरहान दुसरं लग्न करतो आहे.