लॉकडाऊन काळात नेहा पेंडसेला लागलाय्‌ कुत्र्याचा...

लॉकडाऊन काळात नेहा पेंडसेला लागलाय्‌ कुत्र्याचा लळा (Adorable : Neha Pendse Spends Quality Time With Her Cute Pet Dog)

नेहा पेंडसे अतिशय सुंदर आणि उत्तम कलाकार आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत नेहाने मजल मारली आहे. मात्र टेलिव्हिजनने खऱ्या अर्थाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ‘मे आय कम इन मॅम’ या कॉमेडी शोमुळे ती सर्वपरिचित झाली. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील तिची गोरी मेम म्हणजेच अनिता भाभीची भूमिका दर्शकांना फारच आवडली. तर कपिल शर्मा शोमध्येही नेहा दिसली. याशिवाय बॉलिवूडमधील देवदास आणि दाग द फायर अशा चित्रपटांतूनही तिनं काम केलं आहे.

व्यावसायिक शार्दूल याच्याशी लग्न केल्यानंतर नेहाला चाहत्यांची नाराजी सहन करावी लागली होती. कारण शार्दूल विवाहीत होता. नेहाशी लग्न करण्यापूर्वी त्याचा दोन वेळा तलाख झाला होता, शिवाय तो दोन मुलींची बाबा होता. याच कारणामुळे नेहाला लग्नानंतर चाहत्यांच्या ट्रोलला सामोरं जावं लागलं, परंतु त्याचा नेहावर फारसा परिणाम झाला नाही.

बिग बॉस १२ ची स्पर्धक राहिलेली नेहा नेहमीच काही ना काही कारणाने प्रकाशझोतात असते. सध्या या लॉकडाऊनमध्ये नेहाला तिने पाळलेल्या कुत्र्याचा लळा लागलाय्‌. नेहासाठी तो पेट नसून लुसलूशीत टेडी बेअर आहे. नेहाचे त्याच्यावर मुलासारखे प्रेम आहे, ती त्याला नेहमी कडेवर घेऊन असते.

नेहा आपल्या पेटसोबतचे फोटो नेहमीच शेअर करत असते. आताही तिने त्याचे अतिशय क्यूट फोटो प्रदर्शित केले आहेत. तिने कुत्र्यासोबतच्या आपल्या फोटोंना मेरा स्ट्रेस बस्टर अशी कॅप्शनही दिली आहे. पुढे तिने म्हटलंय की, आपल्या जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला प्रेमाशिवाय अजून काहीच अपेक्षित नसते. तुम्ही तुमच्या वाट्याचं प्रेम कधी शेअर केलं आहे का?

नेहाचे हे फोटो पाहिल्यानंतर तिला कुत्र्याचा किती लळा आहे, हे लक्षात येतं

नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही आपल्या टेडी बेअरच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असलेले फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोला स्टेअर कॉन्टेस्ट असं नावही दिलं आहे. यात दोघंही एकमेकांकडे अतिशय जिव्हाळ्याने पाहत आहेत.

नेहाच्या या पोस्टला भरघोस प्रतिक्रिया मिळत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम