बोनी कपूरने जान्हवी कपूर, नव्या नंदा आणि अगस्त्...

बोनी कपूरने जान्हवी कपूर, नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा यांचा बालपणीचा जुना फोटो प्रसिद्ध केला (Adorable! Boney Kapoor Shares An Unseen Childhood Picture Of Janhvi Kapoor, Agastya Nanda And Navya Naveli)

बोनी कपूरने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक जुना, संग्रहातील फोटो शेअर केला आहे. जान्हवी कपूर, नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा यांचा बालपणीचा हा अतिशय गोड फोटो आहे. त्यात हे तिघे खेळताना दिसत आहेत. यातील नव्या नंदा म्हणजे अमिताभ बच्चनची नात आहे. अमिताभची मुलगी श्वेता हिची ही मुलगी. तर अगस्त्य हा नव्याचा भाऊ असून तो आता झोया अख्तरच्या नेटफ्लिक्स वर येणाऱ्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. त्यामध्ये खुशी कपूर त्याची नायिका आहे.

या जुन्या फोटोमध्ये एकत्र खेळत असताना तिघेही अगदी गोड दिसत आहेत. ‘बचपन की यादे’ अशी कॅप्शन बोनीने त्याला दिली आहे. चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला असून ते चांगल्या कमेंटस्‌ देत आहेत. जान्हवी तर सर्वाधिक गोड दिसते आहे.

अलिकडेच बोनी कपूरने आपली मुलगी अंशुला आणि अनिल कपूरची मोठी मुलगी रिया यांचाही बालपणीचा फोटो प्रसिद्ध केला होता. त्यावर बोनीने लिहिले होते – अंशुला रिया की सुरक्षित बाहों में… सोबत त्याने हार्टवाले इमोजी पोस्ट केले होते. या जुन्या फोटोवर अंशुला व रिया यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या.